ETV Bharat / city

नागपूर - औरंगाबाद महामार्गावर ट्रक-टँकरची समोरासमोर धडक; तीन गंभीर - ट्रक

चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेडजवळ ट्रक आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त ट्रक आणि टँकर
author img

By

Published : May 16, 2019, 9:27 AM IST

नागपूर - औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवर तांदळाचा ट्रक व डांबराचा टँकर यांच्यात बुधवारी दुपारी समोरासमोर धडक झाली. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेडजवळ समोरासमोर झालेल्या या भीषण अपघातात दोन्ही वाहनांची कॅबीन चकनाचूर झाली.

अपघातग्रस्त ट्रक आणि टँकर

भंडाऱ्यावरून मुंबईकडे तांदूळ घेऊन जाणारा ट्रक ( एमएच-16, सीसी-7571 ) आणि नागपूरकडे जाणाऱ्या टँकरची ( एमएच-46, बीबी-6937 ) घुईखेड ते चंद्रभागा नदीजवळ जोरदार धडक झाली. यामध्ये तांदळाच्या ट्रकचा चालक संजय भिमराव सिरसाठ ( रा. टेंभुर्णी ता. शिरूर जि. बीड ), क्लिनर दीपक खेडकर ( रा. आगासखेड ता. पाथर्डी जि. अहमदनगर ) व डांबराच्या टँकरचा चालक, असे तिघे गंभीर जखमी झाले. तिघांनाही 108 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात एवढा भीषण होता, की दोन्ही ट्रकच्या कॅबीनचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातानंतर बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यानंतर देवगाव महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. सदर घटनेचा पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक वसंत राठोड, सुरेंद्र कोहरे करीत आहेत.

Intro:नागपुर - औरंगाबाद हायवेवर दोन ट्रकांची समोरासमोर जोरदार धडक

घुईखेड जवळील घटना, दोन्ही ट्रकांच्या कॅबीन चकनाचुर

३ गंभीर जखमी

अमरावती अँकर

नागपुर - औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवर तांदुळाचा ट्रक व डांबराचा टँकर यांच्यात चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड जवळ झालेल्या समोरासमोरील भिषण अपघातात ३ गंभीर झाल्याची घटना बुधवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली. 

प्राप्तमाहितीनुसार, एमएच १६ सीसी ७५७१ क्रमांकाचा ट्रक भंडारावरून मुंबईच्या दिशेने तांदूळ घेऊन जात असतांना एमएच ४६ बीबी ६९३७ क्रमांकाचा डांबराचा टँकर नागपुरच्या दिशेने जातांना ओव्हरटेकच्या नादात घुईखेड ते चंद्रभागा नदीजवळील शरद गुल्हाणे यांच्या शेताजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये तांदूळाच्या ट्रकाचा ड्रायव्हर संजय भिमराव सिरसाठ रा. टेंभुर्णी ता. शिरूर जि. बीड, क्लिनर दिपक खेडकर रा. आगासखेड ता. पाथर्डी जि. अहमदनगर व डांबराच्या टँकरचा ड्रायव्हर असे तिघे गंभीर जखमी झाले असुन तिघांनाही १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिनीने रूग्णालयात भरती करण्यात आले. सदर अपघात एवढा भिषण होता की दोन्ही ट्रकच्या कॅबीनचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातानंतर बराच वेळ वाहतुक विस्कळीत झाली होती. यानंतर देवगाव महामार्ग पोलीसांनी वाहतुक सुरळीत केली. सदर घटनेचा पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचे एएसआय वसंत राठोड, सुरेंद्र कोहरे करीत आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.