नागपूर - कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या नागपूरच्या मेयो रुग्णालयातील 5 डॉक्टरांसह 15 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. कोरोनामुळे दगवलेल्या 68 वर्षीय रुग्ण 4 एप्रिलला शासकीय मेयो रुग्णालयात दाखल केला होता.
हेही वाचा... कोरोनाचा बीडमध्ये शिरकाव; आष्टी येथे आढळला पहिला रुग्ण
संबंधीत वृद्ध व्यक्तीचा 5 एप्रिलला मृत्य झाल्यानंतर 6 एप्रिलला त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ज्यामुळे त्याला दाखल करण्यापासून संपर्कात आलेले मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यासह 5 निवासी डॉक्टर, 5 नर्सेस व 5 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. जरी त्यांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले, तरिही त्या सर्वांना पुढील 14 दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबीय आणि संपर्कात आलेल्या 17 व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.