नागपूर - नागपुरात नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रमना मारोती या परिसरात नववीत शिकणाऱ्या चिमुकल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सर्वेश सचिन माकडे, असे मृतक मुलाचे नाव आहे. सर्वेशने आत्महत्या का केली असावी या संदर्भात खुलासा झालेला नाही. मात्र खेळ खेळताना किव्हा इंटरनेट वरील प्रँक व्हिडीओ बघून अपघाताने त्याला गळफास लागून मृत्यू झाला, असावा असा कयास बांधला जात आहे.
आकस्मिक मृत्यूची नोंद-
मृतक सर्वेश सचिन माकडे हा १४ वर्षीय मुलगा एका सधन कुटुंबातील आहे. वडील भूलतज्ज्ञ तर आणि दंतचिकित्सक आहेत. सर्वेशचे आई वडील नागपूरच्या जवळच्या कुही परिसरात त्यांच्या शेतावर गेले होते. त्यावेळी घरी सर्वेश त्याची १० वर्षीय बहीण आणि वृद्ध आजी-आजोबा होते. दुपारच्या सुमारास सर्वेश आणि त्याची बहीण घराच्या तिसऱ्या माळ्यावर खेळत होते. त्यानंतर सर्वेश बाथरूम मध्ये गेला असता त्याची बहीण खालच्या माळ्यावर आली. संध्याकाळी ७ च्या सुमारास डॉक्टर दम्पत्ती घरी परत आल्यावर मुलाच्या आईने वरच्या मजल्यावर जाऊन मुलगा ऑनलाईन क्लास करतोय की नाही हे तपासले असता त्यांचा मुलगा सर्वेश बाथरूम जवळ आलमारीच्या हुक ला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. आई वडील दोघे डॉक्टर असल्याने दोघांनी तातडीने प्रथमोपचार देण्याचे प्रयत्न केले. मात्र मुलाने काहीच प्रतिसाद दिला नाही. अॅम्ब्युलन्स बोलावून मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टर्स ने त्याला तपासून मृत घोषित केले. सर्वेशच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरु केला आहे.
खेळताना गळफास लागून मृत्यू झाल्याची शक्यता-
नंदनवन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे. पोलिसांनी आई वडिलांचे म्हणणे नोंदवून घेतले आहे. पोलिसांच्या आतापर्यंतच्या माहितीनुसार घरी खेळता खेळता गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता समोर आली आहे. एखादं प्रँक व्हिडीओ पाहून त्याचा अनुकरण करताना ही घटना घडली असावी असे पोलिसांना वाटत आहे. विशेष म्हणजे बाथरुम जवळ गळफास लागलेल्या अवस्थेत आढळलेल्या मुलाच्या गळ्याभोवती एक मफलर बांधलेलं आढळलं.
हेही वाचा- मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझेंचा सहभाग; एटीएसची महत्त्वाची माहिती