ETV Bharat / city

नागपुरात 12 वर्षीय चिमुकल्याची गळा आवळून हत्या; पोलिसांचा बहिणीवर संशय - नागपूर गुन्हे वार्ता

दुगधामना परिसरात एका १२ वर्षीय चिमुकल्याची गळा आवळून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुजल नाशिकराव रामटेक, असे हत्या झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

12 year old boy strangled to death in Nagpur

author img

By

Published : Oct 19, 2021, 10:12 AM IST

नागपूर - नागपूर शहरातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दुगधामना परिसरात एका १२ वर्षीय चिमुकल्याची गळा आवळून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुजल नाशिकराव रामटेक, असे हत्या झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. अनैतिक संबंध लपवण्यासाठी सुजलच्या बहिणीने त्याची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी सुजलच्या बहिणीसह मित्राला ताब्यात घेतले आहे.

नाशिकराव रामटेक यांना दोन अपत्य आहेत. त्यापैकी मोठी मुलगी ही १७ वर्षांची आहे. तर सुजल हा १२ वर्षांचा होता. तो दुगधामना येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सहावी शिकत होता. काल सुजल खेळून घरी आल्यानंतर अचानक निपचित पडला. त्यानंतर सुजलच्या बहिणीने आरडाओरडा कडून शेजारच्यानां गोळा केले. मात्र, तोपर्यंत सुजलचा मृत्यू झाला होता. घटनेच्या वेळी सुजलचे आई वडील कामानिमित्ताने घराबाहेर गेले होते.

अनैतिक संबंधातून हत्या? -

सुजलच्या बहिणीने शेजारच्या लोकांना माहिती दिली की सुजल खेळून घरी परतल्यानंतर अचानक निपचित पडला. मात्र, त्याच्या गळ्या आवळ्याच्या खुना दिसत होत्या. प्रकरण संशयास्पद वाटते असल्याने स्थानिकांनी लगेच या घटनेची माहिती वाडी पोलिसांना ठाण्यात कळवली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली, तेव्हा परिस्थिती संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यामुळे अनैतिक संबंध लावण्यासाठी सुजलच्या मोठ्या बहिणीने मित्राच्या मदतीने त्याची हत्या केली असावी, या असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. पोलिसांनी सुजलची मोठी बहीण आणि मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - 'करेक्ट कार्यक्रम' करणाऱ्या नेत्याला 'शॉक' द्या, चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटलांना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.