ETV Bharat / city

दिल्लीहून नागपुरात आलेल्या १०३ विमान प्रवाशांची चाचणीच नाही; १२ जण कोरोना पॉझिटिव्ह - nagpur corona cases

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. याच परिस्थितीत नागपुरात दिल्लीवरून आलेल्या १२ विमान प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्रवासापूर्वी या विमानातील एकाही प्रवाशाने आरटीपीसीआर चाचणी केली नसल्याचे समोर आले.

nagpur corona
विमान प्रवाशांची कोरोना चाचणीच नाही
author img

By

Published : Nov 27, 2020, 5:04 PM IST

नागपूर - राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून खबरदारी म्हणून परराज्यातून येणाऱ्या नागरिकांचे रेल्वे स्थानक, विमानतळावर चौकशी करण्यात येत आहे. नागपूर विमानतळावरही प्रवाशांची तपासणी केली जात आहे. या चौकशी दरम्यान परराज्यातून आलेल्या १२ प्रवाशांना कोरोनाची बाधा असल्याचे समोर आले आहे. हे प्रवासी दिल्लीहून नागपुरात दाखल झाले असता, त्यांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात ते कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर खबरदारी म्हणून मनपा व प्रशासनाकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला सुरुवात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे दिल्लीहून आलेल्या १२ प्रवाशांना कोरोनाची बाधा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीहून आलेल्या प्रवाशांना विमानतळावर आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल मागितले असता, ते या प्रवाशांकडे नव्हते. त्यानंतर विमानतळावरच या प्रवाशांची आरटपीसीआर चाचणी करण्यात आली. त्या चाचणीत १२ प्रवाशांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.

१०३ प्रवासी तपासणीविनाच नागपुरात-

विशेष म्हणजे या विमानातून आलेल्या तब्बल १०३ प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणी अहवाल नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या सर्वाचेही आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. शिवाय खबरदारी म्हणून मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या आदेशानुसार पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांचे कॉन्टँक ट्रेसिंग करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. तसेच परराज्यातून नागपुरात दाखल होणाऱ्या नागरिकांची आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणे तपासणी केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

रेल्वे स्थानकावरही कोरोना चाचणी अनिवार्य-

नुकतेचे रेल्वे स्थानकावरही ही प्रक्रीया सूरू आहे. त्याचबरोबर रस्ते मार्गानुसार राज्याच्या सीमेवरही कसून चौकशी करण्यात येत आहे. अशावेळी विमानतळावर सुरू असलेल्या चौकशीत १२ प्रवासी पॉझिटिव्ह आढळल्याने मनपा व स्थानिक प्रशासनाकडूनही चौकशी अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून येत आहे. शिवाय परराज्यातून नागपुरात दाखल होणाऱ्या नागरिकांनी चाचणी करूनच नागपुरात यावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.