ETV Bharat / city

लॉकडाऊन शिथील होताच उपराजधानीत सतरा दिवसांमध्ये 14 खून; कायदा, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर - उपराजधानीत खुनाच्या घटनेत वाढ

राज्याची उपराजधानी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरात लॉकडाऊन नेमकं जनतेसाठी खुले करण्यात आले की गुन्हेगारांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये नागपुरात तब्बल 14 खुनाच्या घटना घडल्या आहेत.

nagpur
घटनास्थळ
author img

By

Published : Jun 18, 2020, 9:49 PM IST

Updated : Jun 18, 2020, 10:07 PM IST

नागपूर - लॉकडाऊन अनलॉक व्हायला सुरवात होताच नागपुरातील गुन्हेगार मोकाट सुटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्याची उपराजधानी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरात लॉकडाऊन नेमकं जनतेसाठी खुला करण्यात आले की गुन्हेगारांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या १७ दिवसांमध्ये नागपुरात तब्बल 14 खुनाच्या घटना घडल्या आहेत. गेल्या पाच महिन्यात नागपुरातील गुन्हेगारी कमी झाली आहे, मात्र गेल्या आठ दिवसात खुनाच्या घटनांचे प्रमाण वाढले आहेत. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा पोलीस आयुक्त डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांनी केला आहे. तर अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मते शहरात घडलेल्या खुनाच्या घटनांमागे पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगारांचा सहभाग दिसून येत असला तरी क्षणिक वादातून घडणाऱ्या घटनांचे प्रमाण जास्त आहे. शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत सर्व गुन्हेगारांवर नजर ठेवली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

लॉकडाऊन शिथील होताच उपराजधानीत सतरा दिवसांमध्ये 14 खून; कायदा, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच बिळात लपलेले गुन्हेगार पुन्हा मोकाट झाले आहेत. त्यामुळे उपराजधानी नागपूरचा गुन्हेगारी आलेख पुन्हा चढायला लागला आहे. तसं पाहिलं तर नागपुरात रक्त रंजित घटनांची सुरवात २८ मे पासून झाली आहे. नागपूरच्या पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत एका अनोळखी मजुराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. चिमूटभर तंबाखूसाठी प्रवासी मजुराचे अमित काकडे व पुरुषोत्तम विश्वकर्मा यांच्यासोबत भांडण झाले आणि याच वादातून मद्यपान करून शुद्धी हरपलेल्या अमित काकडे आणि पुरुषोत्तम विश्वकर्माने त्या मजुराच्या डोक्यावर सिमेंटचा मोठा दगड मारून त्याची हत्या केली. पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केली असली, तरी मृतकाची ओळख अद्याप पटली नाही. त्यानंतर खुनाची सुरू झालेली मालिका अजूनही थांबवण्यात पोलीस विभागला सपशेल अपयश आलेलं आहे. त्यानंतर जणू एक दिवसाआड खुनाच्या घटना घडू लागल्या आहेत. केवळ १७ दिवसांच्या कालावधीत नागपूर शहरात एका मागे एक अशा ११ खुनाच्या घटना घडल्या आहेत. तर लूट आणि सामूहिक बलात्काराच्या प्रत्येकी एक अशा दोन अत्यंत गंभीर घटना घडल्या आहेत. कोरोनाशी लढणारा नागपूर जिल्हा गुन्हेगारीमुळे रक्तरंजित होताना दिसून येत आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जिल्ह्यातच गुन्हेगारांनी शांतता भंग केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जून महिन्यात घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा क्रम

०१) १ जून रोजी लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत मालधक्का या ठिकाणी धीरज साळवे नावाच्या तरुणाची अज्ञात आरोपींनी गळा आवळून हत्या केली. या घटनेचे आरोपी अद्यापपर्यंत अटक झाले नसून हत्येचे कारणही पोलीस शोधू शकलेले नाहीत.

०२) १ जून रोजीच नागपुरातील अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सिव्हिल लाईन्स परिसरात बाईकवर आलेल्या सहा लुटारूंनी ब्रिन्क्स प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून १८ लाख ३१ हजार रुपयांची रोकड लुटून नेली. भर रस्त्यात दुपारी दोन वाजता झालेल्या या लुटीनंतर नागपुरात सुरक्षा व्यवस्थेच्या स्थितीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. गुन्हे शाखेने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत १२ तासाच्या आत सहा पैकी चार लुटारूंना अटक करत लुटीची साडे सहा लाख रुपयांची रोकड जप्त केली.

०३) २ जूनच्या पहाटे कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत भुलेश्वर नगर परिसरात राज डोरले या तरुणाची डोक्यावर लाकडी बॅटने हल्ला करून आणि गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. राज डोरले हा भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी होता. राज याचे मुकेश नारनवरे आणि अंकित या तरुणांसोबत जुने वाद होते. घटनेच्या दिवशी राजला एकटे साधून मुकेश नारनवरे आणि अंकित यांनी डाव साधत त्याची हत्या केली होती. हत्येनंतर दोघे स्वतः पोलीस स्टेशनला चालत जाऊन पोलिसांना शरण गेले होते.

०४) ३ जूनच्या रात्री यशोधरानगर पोलीस स्टेशन अंतर्गत फुकट नगर परिसरात अन्नू ठाकूर या सराईत गुन्हेगाराची प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांनी हत्या केली. मृतक अन्नू ठाकूर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच जेलमधून पॅरोलवर सुटून बाहेर आला होता. जेलमधून बाहेर आलेल्या अन्नू ठाकूरपासून जुन्या वादाचे उट्टे काढण्यासाठी मोहम्मद कलीम उर्फ मक्खन अन्सारी, मेहबूब अली आणि उस्मान अली या प्रतिस्पर्धी टोळीतील गुन्हेगारांनी हत्या केली.

०५) फुकट नगर मध्ये झालेल्या गुंडाच्या हत्येचे आरोपी अटक करून पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. ४ जूनच्या दुपारी प्रताप नगर पोलीस स्टेशन अंतर्गत गोपाळनगर परिसरात कार्तिक साळवी या केबल ऑपरेटरची भर रस्त्यात हत्या करण्यात आली. कार्तिक बाईकवरून जात असताना दोन तरुणांनी त्याचा पाठलाग करत चालत्या बाईकवर डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करत त्याला खाली पाडले आणि एकानंतर एक असे डोक्यावर अनेक वार करत त्याची हत्या केली. एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

०६) नागपूर शहरात गुन्हेगारीमुळे रोजच रक्त सांडत असताना ग्रामीण भागात ही गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. गृहमंत्री आणि देशमुख यांच्या काटोल मतदारसंघातच एका कुख्यात गुन्हेगाराची हत्या झाली आहे. २९ मे रोजी काटोलमध्ये मुख्तार अली इराणीची हत्या करण्यात आली. मुख्तार अली कुख्यात गुन्हेगार होता. घटनेच्या दिवशी मुख्तार अली याने चिकन दुकानावर जाऊन दादागिरी करत उधारीवर चिकन मागितले होते. मात्र, दुकानदाराने ते देण्यास नकार दिल्यानंतर मुख्तार अलीने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने दुकानातील कामगाराच्या पाठीवर चाकुने गंभीर वार करत त्याला जखमी केले होते. रात्री पेठ बुधवार परिसरातील हेटी पुलावर पुन्हा उफाळून आलेल्या वादात मात्र सहा जणांनी मिळून मुख्तार अली इराणीची हत्या केली होती. या घटनेत पोलिसांनी चिकन दुकानदारासह सहा जणांना अटक केली आहे.

०७) १ जूनच्या रात्री नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये राजू कश्यप या खासगी कंपनीतील एका व्यवस्थापकाची सहा जणांनी चाकूने वार करून हत्या केली होती. पैशाच्या जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली खरी. मात्र, या घटनेतील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता या घटनेमागे वसुलीचा वेगळा वाद असल्याची चर्चा कन्हान परिसरात सुरु आहे. पोलिसांनी या घटनेतील काही आरोपीना अटक केली आहे.

०८) २ जूनच्या पहाटे नागपूर जिल्ह्यातील पाटनसावंगीमध्ये उदय नारायण यादव या ट्रक चालकाची हत्या करण्यात आली होती. जेवताना उदयनारायण याचे दुसऱ्या चालकासोबत वाद झाल्याने त्यानेच ही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

०९) ११ जूनला शहरातील शांती नगर पोलीस स्टेशन हद्दीत कल्लू उर्फ सुरेंद्र तभने नावाच्या व्यक्तीचा खून झाला. दारू पिण्याच्या वादातून दोन आरोपींनी कल्लूच्या डोक्यावर हथोडीने वार करून त्याचा खून केल्याची माहिती सामोर आली आहे

१०) सात जून रोजी नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुख्य मार्गावरील आठवडी बाजारात कुख्यात गुंड प्रदीप उर्फ बाल्या वंजारीची हत्या झाली आहे. बाल्याची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरूनच अटक केली होती.

११) चार जूनला हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत हत्या झाली. वैभव मूर्ते असे मृत तरुणाचे नाव आहे. वैभवच्या खुनामागील कारण अद्याप पुढे आले नसल्याने त्याचा खून कुणी केला हे देखील समजू शकलेले नाही. लॉकडाऊन दरम्यान नागपुरातील गुन्हेगारी थोडी थंडावली होती. लॉकडाऊन शिथिल होताच आता गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले की काय असे चित्र आता दिसू लागले आहे. गेल्या आठवडाभरात नागपूर शहरातच खुनाच्या सहा घटनांनी नागपूर पोलिसांच्या चिंतेत आणखी भर टाकली आहे.

१२) १७ जूनला कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत नितेश पटेल नामक व्यक्तीचा खून झाला आहे. तो मोलमजुरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या वादातून त्याच परिसरात राहणाऱ्या सात आरोपींनी संगनमत करून त्याची हत्या केल्याचे बोलले जात आहे. नितेशचा खून केल्यानंतर सर्व आरोपी पळून गेले आहेत.

१३) १७ जून रोजीच बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत निरंजन नगरच्या ममता सोसायटीत राहणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीचा त्याच्याच मित्राने खून केल्याची घटना समोर आली आहे. रामलखन पाल असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या खुनाच्या आरोपाखाली बेलतरोडी पोलिसांनी अनिल मेश्राम याला अटक केली आहे.

१४) जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कन्हान नदीच्या तीरावर असलेल्या हरदास स्मशान घाटात एका अनोळखी इसमाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. बाबू हरदास एल. एन यांच्या समाधीस्थळी हा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत असल्याने या खून प्रकरणात विविध तर्कवितर्क लावण्यात येत असून या खुनाचे रहस्य अजूनही कायम आहे.

अवघ्या सतरा दिवसांमध्ये नागपूर शहर आणि जिल्ह्यात तब्बल हत्येच्या १४ घटना घडल्या आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या नागपुरात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकारी गुन्हेगारीच्या या वाढलेल्या घटनांमागे लॉकडाऊनमुळे वाढलेली बेरोजगारी तसेच कोरोनाच्या भीतीमुळे तुरुंगातून पॅरोलवर सोडण्यात आलेले गुन्हेगार असे कारण सांगत आहेत. ते कारण ग्राह्य असले तरी नागपूर जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे लॉकडाऊन जनतेसाठी खुला झाला आहे की गुन्हेगारांसाठी असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाल्या शिवाय राहत नाही.

Last Updated : Jun 18, 2020, 10:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.