ETV Bharat / city

विशेष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 109 वा दीक्षांत समारोह; 146 गोल्ड मेडलची होणार लयलूट - नागपूर विद्यापीठाचा 109 वा दीक्षांत समारोह

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचा 109 व्या दीक्षांत समारोहात एकूण 146 गोल्ड मेडलची लयलूट केली जाणार आहे. 105 विद्यार्थ्यांना हे 146 गोल्ड मेडल दिले जाणार आहेत,तर 8 विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल देऊन गौरविण्यात येईल. याशिवाय 27 विद्यार्थ्यांना कॅश प्राईज दिले जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक मेडल वाढवण्यात आले आहे.

105 gold medals to distributed at the 109th convocation of rashtrasant tukdoji maharaj nagpur university
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 108 वा दीक्षांत समारोह
author img

By

Published : May 3, 2022, 8:28 PM IST

Updated : May 5, 2022, 7:19 AM IST

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचा 109 व्या दीक्षांत समारोहाचा मुहूर्त अखेर निश्चित करण्यात आलेला आहे. 25 मे रोजी दीक्षांत समारोह विद्यापीठाकडून आयोजित केला जाणार आहे. यामध्ये विविध विभागातून प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना 146 गोल्ड, 8 सिल्वर पदके आणि 27 कॅश प्राईज दिले जाणार आहेत. पदक तालिकेत सर्वाधिक १० पदके बीए एलएलबीची विद्यार्थीनी अपराजिता गुप्ताला दिले जाणार आहेत. तर एमबीएची विद्यार्थीनी आरजु बेगने 8 पदके पटकावली आहेत.

पदवी आणि पदव्युत्तर पदव्यांमध्ये 20 टक्क्यांची वाढ - गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे निकालाच्या टक्केवारीत विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याचा परिणाम दीक्षांत सोहळ्यात दिसून येईल. पदवी आणि पदव्युत्तर पदव्यांमध्ये 20 टक्क्यांची वाढ आहे. त्याच बरोबर नागपूर विद्यापीठाने पीएच.डी चा व्हायवा सुद्धा ऑनलाइन पध्दतीनेचं घेतल्यामुळे यामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे.

कुणाला किती मेडल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून बीए एलएलबीचे शिक्षण पूर्ण करणारी विद्यार्थीनी अपराजिता गुप्ताला सर्वाधिक दहा पदके दिली जाणार आहेत. जी.एच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी आरजु बेगने एम बी ए प्रशिक्षण पूर्ण केले आहे, तिला आठ पदके दिली जाणार आहे. याशिवाय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून एमएससी (रसायनशास्त्र) अभ्यास पूर्ण करणारी निधी शाहू हजने पाच पदके पटकावली आहेत, त्यापाठोपाठ मधुकरराव वासनिक महाविद्यालयाची विद्यार्थिनी शुभांगी धारगवेला 5 पदके बहाल केली जातील.

146 गोल्ड मेडलची लयलूट - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचा 109 व्या दीक्षांत समारोहात एकूण 146 गोल्ड मेडलची लयलूट केली जाणार आहे. 105 विद्यार्थ्यांना हे 146 गोल्ड मेडल दिले जाणार आहेत,तर 8 विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल देऊन गौरविण्यात येईल. याशिवाय 27 विद्यार्थ्यांना कॅश प्राईज दिले जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक मेडल वाढवण्यात आले आहे.

सिल्वर, गोल्ड मेडलची रोचक माहिती - प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना दिले जाणारे गोल्ड आणि सिल्वर मेडल किती वजनाचे असतात या बाबत विद्यार्थ्यांसोबतच प्रत्येकाला उत्सुकता असते. गोल्ड मेडल खरोखरच सोन्याचं असतं का हे सुद्धा लोकांना जाणून घेण्यात विशेष रस असल्याने काही रोचक माहिती उपलब्ध झाली आहे. गोल्ड आणि सिल्वर मेडलचे वजन हे साधारणपणे 15 ग्रॅम इतके असते. ज्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल दिले जातात,ते मेडल चांदीचे असून त्यावर सोन्याचा मुलामा चढवला जातो. विद्यापीठाकडून दिले जाणारे मेडल हे कुण्याच्या तरी स्मृतिप्रीत्यर्थ दिले जाते,त्यामुळे दानदात्याकडून मिळालेल्या निधीवर वर्षभरात आलेल्या व्याजातून मेडल तयार केलं जातं. त्यामध्ये चांदीचं मेडल आणि सोन्याचा मुलामा चढवला जातो. व्याजाची रक्कम अधिक असल्यास सिल्वर मेडलच्या वजनात मात्र वाढ होऊ शकते हे महत्त्वाचे. विद्यार्थ्यांना मेडल सोबत त्या मेडलमध्ये वापरण्यात आलेल्या धातूच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र देखील दिलं जातं

कुठे तयार होतात मेडल - नागपूर विद्यापीठात होऊन दिले जाणारे मेडल कुठे तयार होतात, कोण तयार करतात हा देखील अनेकांना प्रश्न पडला असेलचं. विद्यापीठ मेडल तयार करण्यासाठी ई-टेंडर मागवते. ज्याचा टेंडर सोयीस्कर असेल त्याला मेडल तयार करण्याची जबाबदारी दिली जाते. महत्त्वाचे म्हणजे देशात काही मोजक्याचं ठिकाणी मेडल तयार केले जातात, त्यामध्ये इंदोर, ग्वालियर आणि अमरावती शहरांचा समावेश आहे.

दीक्षांत समारोहात गैरहजर विद्यार्थ्यांना केला जातो संपर्क - शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी कामाच्या निमित्ताने बाहेरगावी किवा परदेशात असतात,तर काही विद्यार्थी हे बाहेर राज्यातून शिक्षणासाठी नागपूरला येतात त्यामुळे दीक्षांत समारोहात दरवर्षी एकूण विद्यार्थ्यांपैकी काही प्रमाणात गैरहजर राहतात. त्या विद्यार्थ्यांसोबत विद्यापीठाकडून तीन वेळा पत्रव्यवहार केला जातो. त्यामुळे ते विद्यार्थी वर्षभरात कधीतरी वेळ काढून येतात आणि आपले मेडल घेऊन जातात, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

Last Updated : May 5, 2022, 7:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.