ETV Bharat / city

Corona Patients Zero Death In Mumbai: मुंबईत कोरोना रुग्णांत शून्य मृत्यू; आयुक्तांनी मानले आभार

author img

By

Published : Feb 16, 2022, 8:54 AM IST

गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. नागरिकांनी दिलेली साथ आणि पालिकेने केलेल्या उपाययोजना यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रसार आटोक्यात आहे. (Corona Patients Zero Death In Mumbai) याआधी नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. आज शून्य मृत्यूची नोंद झाल्याने आतापर्यंत दहा वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. याबाबत मनपा अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईकरांचे आभार मानले.

मुंबईत दहाव्यांदा कोरोना रुग्णांत शून्य मृत्यूची नोंद

मुंबई - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. नागरिकांनी दिलेली साथ आणि पालिकेने केलेल्या उपाययोजना यामुळे कोरोनाचा प्रसार आटोक्यात आहे. याआधी नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. (corona patients in Mumbai) आज शून्य मृत्यूची नोंद झाल्याने आतापर्यंत दहा वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईकरांची मोलाची साथ लाभल्यामुळेच हे शक्य झाले आहे असे अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.

दहा वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये मार्च (२०२०)मध्ये पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला. तेव्हापासून कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. (Zero death among corona patients In Mumbai) रुग्णसंख्या कमी होत असतानाच मृत्यूंची संख्याही कमी झाली आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर आज १५ फेब्रुवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण दहावेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

पालिकेच्या उपाययोजनामुळे शून्य रुग्ण -

'कोविड - १९' चा पहिला रुग्ण मुंबईत आढळून आल्यानंतर महापालिकेने उपाययोजना केल्या. त्यात प्रामुख्याने कंटेनमेंट झोन, सिल्ड इमारती याबाबत प्रभावी अंमलबजावणी, लवकरात लवकर निदान व्हावे, यासाठी ठिकठिकाणी सुरू करण्यात आलेली 'कोविड' चाचणी केंद्रे, कोविड बाधित रुग्णांना वेळच्या वेळी परिणामकारक औषध उपचार मिळावे यासाठी विभागस्तरावर राबवण्यात आलेली विकेंद्रित नियंत्रण कक्षांची कार्यपद्धती, अल्पावधीत विविध ठिकाणी उभारण्यात आलेली जंबो कोविड रुग्णालये, लसीकरण सुरू झाल्यानंतर त्याबाबत करण्यात आलेली प्रभावी अंमलबजावणी, प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सातत्याने करण्यात आलेली जनजागृती आणि या सर्व प्रयत्नांना मुंबईकरांनी सातत्याने दिलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळेच 'शून्य कोविड मृत्यू' हे लक्ष गाठता आल्याचे सांगत सुरेश काकाणी यांनी मुंबईकरांचे आभार मानले आहेत.

कंटेनमेंट झोनही शून्यावर -

'कोविड १९' या साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना यामुळे गेले काही दिवस 'कंटेनमेंट झोन' व 'सिल्ड' इमारतींची संख्या देखील 'शून्य' नोंदविण्यात आली आहे‌. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्याने केलेल्या विविध स्तरावर प्रयत्नांना मुंबईकरांची मोलाची साथ लाभल्यामुळेच हे शक्य झाले आहे, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा - Actor Deep Sidhu Died In Accident : लाल किल्ला हिंसाचारातील आरोपी दीप सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.