मुंबई - राज्यात कोरोना उतरणीला ( Maharashtra corona update ) लागला आहे. आज एकाही मृत्युची नोंद नसल्याचा दावा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केला ( Zero corona patients deaths in MH ) आहे.
आज दिवसभरात 544 संसर्ग बाधित ( New 544 corona cases in MH ) आढळून आले. तर 1 हजार रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. दुसरीकडे ओमयक्रोनचे रुग्णदेखील घटले आहेत. आज 38 ओमायक्रॉन रुग्णांची ( 34 omicron cases in Mumbai ) नोंद झाली. त्यातील सर्वाधिक पुणे मनपा हद्दीतील आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
राज्यात मागील दोन दिवस चारशे बाधितांची नोंद झाली होती. मात्र मंगळवारी यात किंचित वाढ होऊन 675 कोरोना रुग्ण आढळले. आज पुन्हा रुग्ण संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात 545 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र आज एक ही रुग्ण दगावलेला नाही. मृत्यू दर 1.82 टक्के इतकाच स्थिर स्थावर आहे. दिवसभरात 1007 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.5 टक्के असून आजपर्यंत 77 लाख 13 हजार 575 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
हेही वाचा-Leave from Kharkiv : नागरिकांनी लवकर खार्कीव्ह सोडावे; भारतीय दूतावासाचा सल्ला
कोविडचे निदान करण्यासाठी आजपर्यंत 7 कोटी 80 लाख 3 हजार 848 कोविड चाचण्या केल्या. त्यापैकी 10.9 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 66 हजार 924 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 45 हजार 442 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 660 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 5 हजार 643 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा-Budget Session 2022 : 'या' मुद्यांवर अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची शक्यता; पाहा, विशेष रिपोर्ट...
ओमायक्रोनचे शून्य रुग्ण
ओमयक्रोनचे मंगळवारी 104 रुग्ण सापडले होते. आज 38 नव्या बधितांना लागण झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक पुणे मनपा हद्दीत 37 आणि औरंगाबाद 1 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत 4 हजार 771 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत. तर 4629 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 9382 जणांची जनुकीय चाचणी केली. 8480 चाचण्याचे अहवाल प्राप्त झाले असून 902 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
मुंबई महापालिका - 100
ठाणे - 0
ठाणे मनपा - 16
नवी मुंबई पालिका - 10
कल्याण डोबिवली पालिका -