मुंबई - मतदान हे दर पाच वर्षांनी येते असे आपण म्हणतो, मात्र मतदान हे पुढील पाच वर्षाचे भविष्य असते. राज ठाकरे, नारायण राणेंवर प्रश्न विचारला असता, आदित्य ठाकरे यांनी जाऊ द्या... असे म्हणत उत्तर टाळले. आदित्य ठाकरे यांनी आज लोकमंच या कार्यक्रमात राजकारण, शहरी, ग्रामीण अशा महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच या कार्यक्रमादरम्यान अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरेही दिली.
इंटरनेट वापरणाऱ्या नेटकऱ्यांना ‘भाडिपा’ हे नाव आता नवे राहिलेलं नाही. मराठमोळ्या नेटकऱ्यांसाठी स्टॅण्डअप कॉमेडी, वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ, कास्टींग काऊच यासारखे अनेक प्रयोग आत्तापर्यंत भाडिपा अर्थात भारतीय डिजीटल पार्टीने केले आणि त्याला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत भाडिपाच्या मंचावर अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली असून आज शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली.
सुरवातीच्याच युतीच्या प्रश्नावर उत्तर देताना आदित्य म्हणाले, भाजपासोबत जोडलं तर भाडीपासोबतही जोडून घेऊ. युती कशी झाली, मागील विधानसभेच्या वेळी निवडणूक वेगळी लढलो. भांडणं होत असतात, पण आता आम्ही एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपकडून आम्ही काही वचन पूर्ण करून घेतली. राज्यासाठी आणि देशासाठी एकत्र आलो. आम्ही समविचारी पक्षासोबत जात आहोत, असल्याचेही त्यांनी सांगितले. आदित्य म्हणाले, पर्यावरण हा खूप मोठा विषय आहे, आरे, मेट्रो डेपोला विरोध आहे. परंतु मी मेट्रो चांगली असल्याने वापरतो. आता आपण नेटचे हॉस्पॉट देतो, पुढे ऑक्सिजनचे होटस्पॉट वेळ येणार नाही, यासाठी सर्वांनी पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. झाडे लावली पाहिजे, मुंबईत कचरा व्यवस्थापन योग्य करत आहोत, कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्याचही ते म्हणाले.
दुष्काळी भागात फिरलो, राज्यात काही भागात पाऊस झालाच नाही, हे वाईट असून आमच्या आमदारावर राजकीय गुन्हे असतील, तर हे सर्व गुन्हे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दाखल झाले आहेत. मात्र ज्या आमदारांवर गंभीर गुन्हे असतील, त्यांना बाहेर काढू असेही ते म्हणाले. मुंबईतील रस्त्यावर बोलताना ते म्हणाले, रस्ते हे सर्व एजन्सी करत असतात. पालिकेचे रस्ते सिमेंटचे बनवण्यासाठी मोठा प्रयत्न सुरू आहे. मुंबईत रस्ते बनवणे एका रस्त्याचे काम नाही, रस्ते तयार करताना अनेक परवानग्या आणि अडथळे पार करावे लागतात. मुंबईत अनेक प्राधिकरण आहेत, पण हे सर्व एकत्र येऊन काम करत नाहीत असेही ते म्हणाले.
मुंबईत पहिले तुंबते ती रेल्वे लाईन, रेल्वे पालिकेला सहकार्य करत नाही. मुंबईत गुढग्यापेक्षा जास्त कुठे तुंबत नाही, आता पाण्याचा निचरा लगेच होते. आमच्या नेत्यांनी भ्रष्टचार केला नाही, मी ठाम पणे सांगतो असेही ते म्हणाले.
पूल दुर्घटनेबाबत योग्य कारवाई केली आहे, असे सांगत त्यांनी शिक्षणाशिवाय आपण कुठे जाऊ शकत नाही. शिक्षण जे चालले आहे, यावर लक्ष दिले पाहिजे. आता घेतलेल्या शिक्षणावर पुढे काय करणार आहोत. शिक्षण विभाग सुधारणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही खूप आंदोलन केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांना पोषक आहार देणे गरजेचे आहे. यावर पूर्णविचार केला पाहिजे. मुंबईला केंद्राकडून आणि राज्याकडून जेव्हढे पैसे यायला पाहिजेत तेवढे मिळत नाहीत. बेस्ट बस आपण कमी किमतीत चालवतो असेही ते म्हणाले. बेस्टचे खासगीकरण होणार आहे, असे बोलतात, मात्र ही फक्त अफवा असल्याचेही त्यांनी सांगितले.
आम्ही सिनेमाला विरोध करतो, हे उगाच नसते, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. कॉलेजमध्ये राजकारण नसावे, राजकारणामुळे कॉलेजमध्ये धिंगाणा होतो. दिल्ली उदाहरण तुम्ही पाहिले आहे. राजकारणात येणाऱ्या तरुणांना संधी दिली जात आहे. त्यामुळे राजकारण हे कॉलेजच्या बाहेर असले पाहिजे, निवडणुका नको असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नाईट लाईफमुळे गुन्हे जास्त वाढतात हे मला मान्य नाही, असं सांगत त्यांनी नाईट लाईफ म्हणजे 24 तास हॉटेल उघडे असलेले पाहिजे असेही सांगितले. मुंबईतील मराठी टक्का वाढला, की कमी झाला यात सर्वे कसा झाला आहे ते बघावा लागेल असेही ते म्हणाले.
राजकारणात आलो नसतो तर फोटोग्राफर झालो असतो. आता राजकारणात 10 वर्ष होत आहेत. टोली ब्लेअर मला आवडतो, राजकारणातील आवडता नेता माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.