ETV Bharat / city

मराठमोळ्या नेत्याचा विक्रम मोडत 21 वर्षीय आर्या बनली देशातील सर्वांत तरुण महापौर - मुंबई महापौर संजीव नाईक न्यूज

आर्या येथील ऑल सेंट्स कॉलेजमध्ये शिकणारी बीएस्सीची (गणित) दुसर्‍या वर्षाची विद्यार्थिनी आहे. शहर महापौरपदाची जबाबदारी स्वीकारण्याबरोबरच अभ्यासही सुरू ठेवणार असल्याचे तिने माध्यमांना सांगितले. तिने मराठमोळे नेते संजीव नाईक यांचा सर्वांत कमी वयाचे महापौर बनण्याचा विक्रम मोडीत काढला आहे.

तिरुअनंतपुरम महापौर आर्या राजेंद्रन न्यूज

author img

By

Published : Dec 29, 2020, 6:10 PM IST

मुंबई - केरळमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीनंतर एका 21 वर्षीय तरुणीने महापौरपदावर स्वतःचे नाव कोरत नवीन विक्रम रचला आहे. केरळची राजधानी तिरुअनंतपुरममधील आर्या राजेंद्रन ही 21 वर्षीय तरुणी देशातील सर्वात कमी वयाची महापौर बनली आहे. यासह आर्या हिने नवी मुंबईचे महापौर संजीव नाईक यांचा सर्वांत कमी वयाचे महापौर बनण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. नाईक 1995 साली वयाच्या 23 व्या वर्षी पहिल्यांदा महापौर बनले होते.

महापौर आर्या राजेंद्रन या माकप नेत्या असून त्यांनी 99 पैकी 54 मतांसह पदावर शिक्कामोर्तब केले. मुडवानमुगलमध्ये (तिरुअनंतपुरम) त्यांना जिल्हाधिकारी नवज्योत खोसा यांनी महापौरपदाची शपथ दिली. पक्षातर्फे जिल्हा व राज्य समितीने एकमताने आर्या यांची महापौर पदासाठी उमेदवारी मंजूर केली होती.

आर्या येथील ऑल सेंट्स कॉलेजमध्ये शिकणारी बीएस्सीची (गणित) दुसर्‍या वर्षाची विद्यार्थिनी आहे. शहर महापौरपदाची जबाबदारी स्वीकारण्याबरोबरच अभ्यासही सुरू ठेवणार असल्याचे तिने माध्यमांना सांगितले. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माकप) पी. के. राजू हे तिरुवनंतपुरम महानगरपालिकेचे उपमहापौर आहेत.

हेही वाचा - गुड न्यूज : नव्या कोरोनाचा अद्याप महाराष्ट्रात शिरकाव नाही

दरम्यान, कोल्लममध्ये माकपच्या प्रसन्ना अर्नेस्ट यांनी महापौरपदाची शपथ घेतली. कोल्लमचे महापौर म्हणून त्यांची ही दुसरी मुदत आहे. शपथ घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांना सांगितले की, कोल्लमला राज्यातील सर्वोत्तम महानगरपालिका बनविण्याची आपली महत्वाकांक्षा आहे.

माकपचे एम. अनिलकुमार यांनी एर्नाकुलम महापालिकेचे महापौर म्हणून शपथ घेतली. ही महानगरपालिका राज्यातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते. डाव्या आघाडीने युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) पिछाडीवर टाकत महापालिका ताब्यात घेतली. नवीन महापौरांसाठी स्थानिक समस्या सोडवणे हे एक मोठे आव्हान असेल.

त्रिशूरमध्ये डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि माकपचे बंडखोर कॉंग्रेसचे नेते व्ही. के. वर्गीस नगराध्यक्षपदी निवडले गेले. वर्गीस सैन्य अधिकारी होते. त्यांनी निवृत्तीनंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. जेव्हा कॉंग्रेस पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही, तेव्हा त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि त्यांचा विजय झाला. वर्गीस दोन वर्षांसाठी महापौर असतील आणि त्यानंतर माकपचे नेते उर्वरित तीन वर्षे हे पद सांभाळतील.

कोझिकोडमध्ये सेवानिवृत्त शिक्षक आणि माकप नेत्या बीना फिलिप यांनी महापौरपदाची शपथ घेतली. कोझिकोडला जागतिक दर्जाचे शहर म्हणून विकसित करायचे आहे आणि हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी पक्षाच्या धर्तीवर आपण एकत्रितपणे काम करू, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

केवळ कन्नूर महानगरपालिकेत कॉंग्रेसच्या नेत्याला महापौरपद मिळाले आहे. पक्षाचे नेते टी.ओ. मोहन यांनी महापौरपदाची शपथ घेतली. ते म्हणाले की, कन्नूरला देशाची हातमाग राजधानी बनविण्याचा प्रयत्न करू. कन्नूरमध्ये विणकरांची संख्या मोठी असून हातमाग कापड या प्रदेशातून मोठ्या प्रमाणात निर्यात केले जाते.

हेही वाचा - नववर्षाच्या स्वागतासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.