ETV Bharat / city

विजेचा खांब डोक्यात पडल्याने पाम बीच रोडवर तरुणाचा मृत्यू - तौक्ते चक्रीवादळाबद्दल बातमी

विजेचा खांब डोक्यात पडल्याने पाम बीच रोडवर तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण रात्री १० वाजता ऐरोलीकडे जात होता.

young man died on Palm Beach Road when a power pole fell on his head
विजेचा खांब डोक्यात पडल्याने पाम बीच रोडवर तरुणाचा मृत्यू
author img

By

Published : May 17, 2021, 4:15 PM IST

नवी मुंबई - तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई परिसरात व कोकण किनारपट्टी मोठ्या प्रमाणावर वादळ निर्माण झाले आहे. नवी मुंबईतील पाम बीच रोडवरून जात असताना एका व्यक्तीचा डोक्यावर विजेचा खांब पडून मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - राज्यात तौक्ते चक्रीवादळाचे सात बळी; सिंधुदुर्गात काही खलाशी बेपत्ता

खांब पडून तरुणाचा मृत्यू -

सानपाडा पाम बीच रोडवरून जाताना रविवारी रात्री सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे सानपाडा पामबीच रोडवर विजेचा खांब पडून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विशाल नारळकर (वय - २६) असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण रात्री १० वाजता ऐरोलीकडे जात होता. सानपाडा येथून निघाल्यावर पामबीच वर स्कूटीवरून येताच रस्त्यालगत असलेला विजेचा खांब अचानक त्याच्या डोक्यात पडला. जोरदार हवा असल्याने विजेचा खांब डोक्यात कोसळल्याने विशालला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पामबीच रोडवर जुने झालेले विजेचे खांब बदलून या ठिकाणी नविन विजेचे खांब बसविण्यात आले आहेत. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच नविन बसवलेला विजेचा खांब पडला कसा अशी शंका उपस्थितीत करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि संबंधित महानगर पालिका अधिकारी वर्ग यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विशालच्या नातेवाईकांनी केली आहे.

हेही वाचा - 'तौत्के चक्रीवादळ';मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसास सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.