मुंबई - लोकमान्य टिळक यांच्या 99 व्या पुण्यतिथी निमित्त शैलेंद्र विसबूड या युवकाने टिळकांना एका आगळ्यावेगळ्या प्रकारे आदरांजली वाहिली. टिळकांचा वारसा असलेल्या सरदारगृह येथे तब्बल 100 सूर्यनमस्कार घालून टिळकांना आदरांजली वाहत, त्याने तरुणांना स्वदेशी व्यायामाचा संदेश दिला आहे.
लोकमान्य टिळक यांना स्वदेशी व्यायामाची आवड होती. त्यांच्या 99 व्या पुण्यतिथीनिमित्त काहीतरी वेगळे करण्याचे ठरवले होते. टिळक नियमित व्यायाम करत असत. आताच्या पिढीकडे पाहिल्यास व्यायामाचा अभाव दिसून येतो. म्हणून एक सोप्पा आणि कुठेही करता येणारा व्यायामप्रकार म्हणून सूर्यनमस्कार घालण्याचे ठरवले.
या माध्यमातून, तरुणांना व्यायामाचा संदेश देत, टिळकांचे स्मरण करून देण्याचा माझा मानस आहे. मुंबईतील सरदारगृहाला टिळकांचा वारसा लाभला आहे. तसेच, येथे केसरीचे कार्यालय आहे. म्हणून, मी ही जागा निवडली. तसेच, आता पुढच्या वर्षी शताब्दीनिमित्त देखील काही तरी वेगळे करणार असल्याचे शैलेंद्र यांनी सांगितले.