मुंबई : वाढदिवसाला तलवारीने केक कापत, मोठे सेलेब्रेशन करून परिसरात दहशत निर्माण करण्याचे नवीन फॅड तयार झाले आहे. अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना मुंबईतील बोरीवली ( Mumbai Borivali Crime News ) परिसरात घडल्याचे समोर आली ( Spread Terror by Cutting 20 cakes with a sword ) आहे. या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी कारवाई केली आहे.
तलवारीने तब्बल 20 केक कापून दहशत पसरवण्याचा तरुणाचा प्रयत्न एका तरुणाने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अकरम शेख, असे आरोपीचे नाव आहे. बोरीवलीतील एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीने मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
अकरम शेख याने तलवारीने वाढदिवसाचा केक कापून परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. संबंधित व्हिडिओ बोरिवली एमएचबी ठाणे परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.