ETV Bharat / city

Criticism Mahavikas Aghadi : हॉटेल बदलून निवडणुका जिंकता येत नाहीत, आशिष शेलार यांचा महाविकास आघडीला टोला - एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील

राज्यसभेच्या निवडणुकीत ( Rajya Sabha elections ) महाविकास आघाडीला जोरदार झटका भाजपने दिला होता. राज्यसभेतील पराभवानंतर आता सावध झालेल्या महाविकास आघाडीतील काही पक्षांनी आपले आमदार पुन्हा हॉटेलवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरूनच आता भाजप नेते आशिष शेलार ( BJP leader Ashish Shelar ) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र ( Criticism of Mahavikas Aghadi government ) सोडले आहे.

Ashish Shelar
आशिष शेलार
author img

By

Published : Jun 17, 2022, 9:43 AM IST

Updated : Jun 17, 2022, 10:01 AM IST

मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत ( Rajya Sabha elections ) महाविकास आघाडीला जोरदार झटका भाजपने दिला होता. राज्यसभेतील पराभवानंतर आता सावध झालेल्या महाविकास आघाडीतील काही पक्षांनी आपले आमदार पुन्हा हॉटेलवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरूनच आता भाजप नेते आशिष शेलार ( BJP leader Ashish Shelar ) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र ( Criticism of Mahavikas Aghadi government ) सोडले आहे. हॉटेल बदलून निवडणुका जिंकता येत नाहीत. तुम्ही काहीही करा या निवडणुकीत विजय हा आमचाच होणार, असे ते म्हणाले. त्याचबरोबर एकनाथ खडसे यांना कोणत्याही परिस्थितीत हरवण्यासाठी भाजपने खेळी केल्याचा गोप्यस्फोट एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( MIM MP Imtiaz Jalil ) यांनी केला होता. त्यावरून शेलार यांनी जलील यांच्यावरही टीका केली आहे.

एमआयएम ही शिवसेनेची बी टीम ?- या निवडणुकीबाबात बोलताना शेलार म्हणाले, हॅाटेल बदलून विजय होत नसतो, त्यांनी आमदार कोणत्याही हॅाटेलमध्ये ठेवले, तरीसुद्धा विधान परिषदेत विजय आमचाच होणार आहेत. तसेच खडसे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, कोणाला एका व्यक्तीला पाडण्यासाठी निवडणूक लढवत नाही, आम्ही सेवक म्हणून निवडून येऊन काम करण्यासाठी निवडणूका लढवतो. एमआयएम ही शिवसेनेची बी टीम आहे. तसेच इम्तियाज जलीलांना त्यांच्या पक्षात काय स्थान आहे, हे त्यांनी आधी बघावे. मग दुसऱ्याच्या घरात वाकून बघू नये असा, टोलाही शेलार यांनी लगावला. राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेने डबल स्टारवाली मते आपल्या खांद्यावर लावली आहेत, असेही शेलार म्हणाले.

हॉटेल बदलले म्हणून माणस बदलत नाहीत - शिवसेने काय तयारी केली त्यावर भाष्य करण्याची मी आवश्यकता समजत नाही, भाजपच्या उमेदवारांचा विजय ( victory of the BJP candidates ) हे तिन्ही पक्ष रोखू शकत नाही, नरिमन पॉईंट काय आणि पवई काय माझा वावर सगळी कडे असतो, तिथे कोल्ड्रिंक्स प्यायला जाऊ. हॉटेल बदलले म्हणून माणस बदलत नाहीत, असेही शेलार म्हणाले. त्याचबरोबर एमआयएम आणि शिवसेनेची युतीसुध्दा मुंबईपालिका निवडणुकीत ( Mumbai Municipal Election ) बघायला मिळेल, याचे मला आश्चर्य वाटणार नाही, असेही शेलार म्हणाले आहेत. भाजप या निवडणूकीत उतरली आहे, भाजप कोणत्याही परिस्थितीत पालिका निवडणूक जिंकणारच आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीसोबतच आगामी मुंबई महापालिकेची निवडणूकही चुरशीची होणार आहे हे मात्र निश्चित.

हेही वाचा -Agnipath scheme controversy : बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांची अग्नीपथ योजनेविरोधात निदर्शने, तीन रेल्वे डबे जाळले

हेही वाचा - Rajya Mahila Aayog : महिलेवर अश्लिल टीका करणाऱ्यांवर सुमोटो दाखल करा; महिला आयोगाची मागणी

हेही वाचा -SSC Exam 2022 Result : दहावीचा निकाल असा पाहा ऑनलाईन, यंदाही विद्यार्थिनी विद्यार्थ्यांच्या तुलनेत मारणार का बाजी?

Last Updated : Jun 17, 2022, 10:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.