मुंबई - येस बँकेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राणा कपूर यांना 30 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीकडून विशेष न्यायालयात राणा कपूर यांच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली होती. येस बँकेच्या कर्ज वाटपासंबंधी आणखीन एक गुन्हा राणा कपूर यांच्याविरोधात ईडीकडून दाखल करण्यात आल्यामुळे या संदर्भात पुन्हा एकदा राणा कपूर यांची चौकशी करण्यात येणार आहे.
येस बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर यांनी मॅकस्टार प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 200 कोटी रुपयांचे बेकायदेशीर कर्ज दिल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आलेला आहे. हे कर्ज दिल्यामुळे याचा थेट फायदा राकेश वाधवान, सारंग वाधवान यांना झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. राणा कपूर याआधी न्यायालयीन कोठडीत होते. मात्र त्यांना नव्याने अटक झाल्यामुळे ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाकडून राणा कपूर यांच्याकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
काय आहे प्रकरण -
येस बँकेकडून तब्बल 3,700 कोटी रुपयांचा शॉर्ट-टर्म डिबेंचर हे डीएचएफएलमध्ये एप्रिल 2018 मध्ये गुंतवण्यात आले होते. यासाठी वाधवान बंधूंकडून बँकेचे प्रमुख राणा कपूर यांना 600 कोटी रुपयांची रक्कम मोबदला म्हणून देण्यात आल्याचं सीबीआयने त्यांच्या आरोपपत्रात म्हटलं आहे. यानंतर येस बँक ही डबघाईला आल्यामुळे आर्थिक संकटात सापडली होती.
येस बँक प्रकरण : राणा कपूरला आणखी एका प्रकरणात 30 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी - Rana Kapoor
येस बँकेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राणा कपूर यांना 30 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीकडून विशेष न्यायालयात राणा कपूर यांच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली होती. येस बँकेच्या कर्ज वाटपासंबंधी आणखीन एक गुन्हा राणा कपूर यांच्याविरोधात ईडीकडून दाखल करण्यात आला आहे.