ETV Bharat / city

मालाडमध्ये 2 हजार बेडच्या जम्बो कोविड केंद्राच्या कामाला 'एमएमआरडीए'कडून सुरुवात

author img

By

Published : Apr 22, 2021, 3:15 PM IST

मालाडमधील मैदानात 2000 बेडचे सेंटर उभारण्यात येत असून यात 200 आयसीयू बेड असणार आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांची ही सोय होणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. तर हे काम मे च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करून हे सेंटर पालिकेच्या हाती सोपवण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. तर या सेंटरसाठी 65 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे समजते आहे.

कोविड सेंटर
कोविड सेंटर

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालये, बेड, ऑक्सिजन आणि औषधे कमी पडत असून आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढत आहे. हा ताण कमी करत रुग्णांना बेड आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) पुन्हा एकदा पुढे आले आहे. बीकेसी कोविड सेंटरच्या माध्यमातून एक चांगली आरोग्य सुविधा निर्माण केल्यानंतर आता मालाड येथे 2 हजार बेडचे जम्बो कोविड सेंटर एमएमआरडीएकडून उभारण्यात येत आहे. या कामाला आजपासून सुरुवात झाली असून शक्य तितक्या लवकर हे सेंटर सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती एमएमआरडीएचे सह महानगर आयुक्त बी. जी पवार यांनी दिली आहे.

40 हजार चौरस मीटर जागेवर सेंटर

पहिल्या लाटेत एप्रिलमध्ये रुग्ण संख्या वाढल्यानंतर एमएमआरडीएने बीकेसीत दोन टप्प्यात 2000 बेडचे कोविड सेंटर उभारले. हे सेंटर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून चालवले जात आहे. पहिल्या लाटेत या कोविड सेंटरने महत्त्वाची भूमिका बजावत हजारो रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. तर दुसऱ्या लाटेतही हे सेंटर महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मोठ्या संख्येने येथे रुग्ण उपचार घेत आहेत. तर आता दुसऱ्या लाटेत पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली असून बेड आणि सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे सरकारने आणखी काही सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मालाड मध्ये 2000 बेडचे जम्बो कोविड सेंटर बांधण्याची जबाबदारी एमएमआरडीएने उचलली आहे. यासाठी मंगळवारी मालाडमधील 40 हजार चौरस मीटरच्या मोकळ्या भूखंडाची पाहणी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर सर्व परवानगी घेत काल मैदानाची साफसफाई करण्यात आली. तर आजपासून पुढील कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली आहे.

मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण?

मालाडमधील मैदानात 2000 बेडचे सेंटर उभारण्यात येत असून यात 200 आयसीयू बेड असणार आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांची ही सोय होणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान या कामाला आजपासून सुरूवात झाली आहे. तर हे काम मे च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करून हे सेंटर पालिकेच्या हाती सोपवण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. तर या सेंटरसाठी 65 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे समजते आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.