ETV Bharat / city

चेंबूर परिसरात अडचणींचा लाल'डोंगर'; महापालिका कार्यालयावर धडकल्या महिला

महिलांनी महापालिकेच्या चेंबूर पूर्व एम वॉर्डाच्या कार्यालयाला घेराव घातला. पाणी, शौचालय व उतारावरील कचरा या समस्यांकडे पावसाळ्यात तरी पालिकेने लक्ष द्यावे, यासाठी महिलांनी हे आंदोलन केले.

author img

By

Published : Jun 19, 2019, 9:33 AM IST

आंदोलक महिला

मुंबई - चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात अनेक समस्या असूनही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी महापालिकेच्या चेंबूर पूर्व एम वॉर्डाच्या कार्यालयाला घेराव घातला. यावेळी पाणी, शौचालय व उतारावरील कचरा या समस्यांकडे पावसाळ्यात तरी पालिकेने लक्ष द्यावे, यासाठी महिलांनी पालिकेच्या वॉर्डासमोर घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

आंदोलक महिला

लाल डोंगर परिसरातील 165 वार्डातील पालिका शाळेच्या बाजूस असलेले शौचालय मोडकळीस आले आहे. हे मोडकळीस आलेले शौचालय पालिकेने डागडुजी करावी व वापरण्यासाठी योग्य करावे, यासाठी महिला, पुरुष गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. या शौचालयाचे चेंबर तुंबले आहे. त्याचे घाण पाणी घरात जात आहे. तसेच पिण्याचे पाणी कमी दाबाने येत आहे. काही नागरिकांना कमी दाबाने पाणी येत असल्याने पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांचे भांडण होतात.

चांगुना सोनवणे

तीन वर्षे झाले शौचालय नादुरुस्त असून त्याची डागडुजी नाही. यामध्ये वीज नाही, दार तुटलेले आहेत. चेंबर तुंबलेले आहेत. त्यामुळे याची लवकरात लवकर पालिकेने दुरुस्ती करावी व नव्याने हे शौचालय बांधून महिलांचीची व्यवस्था करावी, यासाठी आम्हाला पालिकेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी यावे लागले.

क्रांती जाधव

हे शौचालय वापरण्याच्या स्थितीत नाही. सर्व मोडकळीस आलेले आहे. यात महिला आत जायला घाबरते. हे शौचालय कधी कोसळेल काही सांगता येत नाही. त्यामुळे बीएमसी एखादी दुर्घटना घडल्यावर हे शौचालय पाहून दुरुस्ती करणार आहे, का असे आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत.

समिंदर अविनाश

पालिकेला भीम आर्मीतर्फे वारंवार तक्रार अर्ज दिलेले आहेत. पण त्या तक्रारीची पालिका दखल घेत नसल्याने आज लालडोंगर विभागातील महिलांसाठी आम्ही पालिकेला घेराव घातला आहे. उद्या सकाळी तुंबलेले चेंबर मोकळे करून पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. हे मोडकळीस आलेले शौचालय बंद करून नवीन बनवण्याचे आज आम्हाला आश्वासन देण्यात आले आहे.

Intro:चेंबूर लालडोंगर परिसरातील नागरी समस्या महिलांचा पालिकेच्या चेंबूर वॉर्डला घेराव.

आज चेंबूरच्या लाल डोंगर परिसरातील महिलांनी नागरी समस्या बाबत पालिकेच्या चेंबूर पूर्व एम वॉर्डला महिलांनी घेराव घालत पाणी, शौचालय,व उतारावरील कचरा समस्या पावसाळ्यात तरी पालिकेने लक्ष द्यावे यासाठी परिसरातील सर्व महिला एकत्र येत पालिकेच्या वॉर्ड समोर घोषणा देत परिसर दणाणून सोडलाBody:चेंबूर लालडोंगर परिसरातील नागरी समस्या महिलांचा पालिकेच्या चेंबूर वॉर्डला घेराव.

आज चेंबूरच्या लाल डोंगर परिसरातील महिलांनी नागरी समस्या बाबत पालिकेच्या चेंबूर पूर्व एम वॉर्डला महिलांनी घेराव घालत पाणी, शौचालय,व उतारावरील कचरा समस्या पावसाळ्यात तरी पालिकेने लक्ष द्यावे यासाठी परिसरातील सर्व महिला एकत्र येत पालिकेच्या वॉर्ड समोर घोषणा देत परिसर दणाणून सोडला

लाल डोंगर परिसरातील 165 वार्डातील पालिका शाळेच्या बाजूस असलेले शौचालय मोडकळीस आले आहे.हे मोडकळीस आलेले शौचालय पालिकेने डागडुजी करावी व वापरण्यासाठी योग्य करावे यासाठी महिला,पुरुष यांनी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. या शौचालयाचे चेंबर तुंबले आहे. त्याचे घाण पाणी घरात जात आहे. तसेच पिण्याचे पाणी कमी दाबाने येत आहे. काही नागरिकांना कमी दाबाने पाणी येत असल्याने पाणी मिळत नाही. त्यामुळे राहिवाश्यांचे एकमेकात भांडण होतात.

चांगुना सोनवणे

तीन वर्षे झाले शौचालय नादुरुस्त असून त्याची डागडुजी नाही.यामध्ये वीज नाही दार तुटलेले आहेत. चेंबर तुंबलेले आहेत.त्यामुळे याची लवकरात लवकर पालिकेने दुरुस्ती करावी व नव्याने हे शौचालय बांधून आम्हा महिलांची ची व्यवस्था करावी यासाठी आम्हला पालिकेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी यावे लागले.

क्रांती जाधव

हे शौचालय वापरण्याच्या स्थितीत नाही कारण सर्व मोडकळीस आलेले आहे. यात कोणतीही महिला आत जायला घाबरते कारण की हे कधी कोसळेल काही सांगता येत नाही .त्यामुळे बीएमसी एखादी दुर्घटना घडल्यावर हे शौचालय पाहून दुरुस्ती करणार आहे. का असे आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत.

समिंदर अविनाश
भीम आर्मी तालुकाध्यक्ष चेंबूर

पालिकेला भीम आर्मी तर्फे वारंवार तक्रार अर्ज दिलेले आहेत पण त्या तक्रारीची पालिका कदापिही दखल घेत नसल्याने आज लालडोंगर विभागातील महिलांसाठी आम्ही पालिकेला घेराव घातला आहे. आज पालिकेतर्फे आम्हला कळवण्यात आले की, उद्या सकाळी तुंबलेले चेंबर मोकळे करून पर्यायी तात्पुरती व्यवस्था करून हे मोडकळीस आलेले शौचालय बंद करून नवीन बनवण्याचे आज आम्हाला आश्वासन देण्यात आले.
.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.