मुंबई : एक फेब्रुवारीला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Finance Minister Nirmala Sitharaman ) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून प्रत्येक क्षेत्राला आशा ( Union Budget 2022 ) आहेत. मात्र या बजेटवर सर्वात जास्त लक्ष महिला वर्गाच आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे बिघडलेली घराची आर्थिक घडी बसवताना महिलावर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या बजेटमध्ये अर्थमंत्री सामान्य गृहिणीला काय दिलासा देणार याकडे तमाम गृहिणी वर्गाचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पातून सामान्य गृहिणीला नेमकं काय अपेक्षित ( Womans Expectations From Union Budget ) आहे? त्याबाबत आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने..
- प्रश्न- एक तारखेला सादर होणाऱ्या बजेट बाबत महिलांच्या काय अपेक्षा आहेत ?
उत्तर- महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोज लागणाऱ्या घर उपयोगी वस्तू देखील खरेदी करणे कठीण झाले असून गहू तांदूळ याचे भाव सातत्याने वाढत आहेत. खाद्यतेलाच्या किमती तर गगनाला भिडत असल्यामुळे गृहिणीच्या घराचा आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सामान्य गृहिणीला अर्थमंत्र्यांनी दिलासा द्यावा
- प्रश्न- प्रत्येक घरात सोने खरेदी कराव लागते. मात्र सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. या बजेटमध्ये दिलासा मिळेल?
उत्तर - प्रत्येक कुटुंबाच्या घरात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सोडून लागत असत. मात्र गेल्या काही वर्षात सोन्याचे भाव गगनाला भिडले. खासकरून गेल्या दोन वर्षात सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर सोन खरेदी झालं आहे. मात्र लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमासाठी सोनं खरेदीच कराव लागत असल्यामुळे सोनं खरेदी करताना पैशाची जुळवाजुळव करणे हे एक मोठे आवाहन गृहिणी समोर असत. त्यामुळे सोन्याच्या किमती कमी करून या अर्थसंकल्पातून सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे.
- प्रश्न - घराचं बजेट सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते का?
उत्तर- मुलांच्या ऑनलाइन शिक्षणामुळे सामान्य कुटुंबावर अजूनही आर्थिक बोजा वाढला आहे. मोबाईलचा महिनाभराचा रिचार्ज करण्याच्या किमती वाढल्या आहेत. तसेच शिक्षण ऑनलाइन पद्धतीने असल्यामुळे मुलांनाही मोबाईल घेऊन द्यावा लागला आहे. त्यासाठीही रिचार्ज करावा लागतो. हा सगळा आर्थिक बोजा नव्याने उभा राहिल्यामुळे घराचं आर्थिक गणित बिघडले आहे.
- प्रश्न- वाढत्या इंधन दराचा फटका सामान्य नागरिकाला आहे? यातून दिलासा मिळेल का?
उत्तर- इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. हे दर वाढल्यामुळे इतर वस्तूंच्या किमती आपोआप वाढत आहेत. यासोबतच रिक्षा टॅक्सी याच्या प्रवासाचे भाडे देखील वाढले आहे. हा सगळा भार सामान्य नागरिकांवर पडत आहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी केल्यास सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल.