ETV Bharat / city

मुंडेनंतर गणेश नाईक! महिलेचे नाईक यांच्याविरोधात गंभीर आरोप - Nerul Police station

गणेश नाईक यांच्यावर आरोप केलेला अर्ज महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात दिला आहे. संबधित महिला ही नेरुळ मध्ये राहत आहे. पोलिसांना दिलेल्या पत्रात महिलेने आमदार गणेश नाईक यांच्यासोबत ती 1993 पासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले आहे.

गणेश नाईक
गणेश नाईक
author img

By

Published : Apr 10, 2022, 7:34 AM IST

नवी मुंबई - धनंजय मुंडे व करुणा मुंडे यांचे प्रकरण ताजे असतानाच भाजपा नेते व आमदार गणेश नाईक यांच्यावर देखील एका महिलेने गंभीर आरोप केले आहे. गणेश नाईक हे माझ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. त्यांच्यापासून तिला 15 वर्षांचा मुलगा असल्याचा धक्कादायक खुलासा या महिलेने केला आहे.

1993 पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये - गणेश नाईक यांच्यावर आरोप केलेला अर्ज महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात दिला आहे. संबधित महिला ही नेरुळ मध्ये राहत आहे. पोलिसांना दिलेल्या पत्रात महिलेने आमदार गणेश नाईक यांच्यासोबत ती 1993 पासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले आहे. त्यांच्यापासून तिला मुलगा झाला असल्याचेही तिने म्हटले आहे. गणेश नाईक हे आठवड्यातून दोन ते तीन दिवस संबंधित महिलेसोबत राहत होते. तसेच संबंधित महिला व गणेश नाईक यांचे शारीरिक संबंध होते असेही तिने म्हटले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना नाईक हे महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री होते. तेव्हा संबंधित महिलेला गणेश नाईक यांच्या पासून दिवस गेले व महिलेला त्यांचा पासून मुलगा झाला, असल्याचेही महिलेने म्हटले आहे.

हेही वाचा - Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरची बाजी; पृथ्वीराज पाटीलने जिंकली मानाची गदा

मुलाच्या भविष्याच्या तरतुदीसाठी टाळाटाळ - संबंधित महिलेने गणेश नाईक यांच्या पासून तीला झालेला मुलगा पंधरा वर्षाचा झाला आहे. मुलाच्या शिक्षणाचा व भविष्याची तरतूद म्हणून उपाययोजना करा असं गणेश नाईक यांना ती महिला वारंवार सांगत होती मात्र नाईक हे आज करू उद्या करू असे सांगून टाळाटाळ करत होते. शिवाय मी काही बोलले कि नाईक मला व माझ्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत असत त्यामुळे माझ्या मुलाला न्याय देणे गरजेचे आहे. त्यामुळे मी कोणत्याही दबावाला बळी न पडता तक्रार करत असल्याचं संबंधित महिलेला म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.