ETV Bharat / city

OLA UBER Charge Extra Fee For AC : ओला-उबेर चालकांकडून मुंबईकरांची लूट?...एसीसाठी मागितले अतिरिक्त शुल्क - मुंबईत ओला उबेर गाडी एसी शुल्क

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात उष्णता ( Heat Wave Increase In Mumbai ) वाढली आहे. त्यामुळे उन्हाळाच्या चटकेपासून बचावासाठी वातानुकूलित वाहनाचा आसरा मुंबईकर घेत आहे. मात्र, ओला-उबेर ( Ola Uber Cab ) चालकांकडून मुंबईकरांची लूट होताना दिसून येत आहे. उबेरमध्ये एसी लावयाचा असेल, तर प्रवाशांना अतिरिक्त शुल्क ( Ola Uber Extra Charge For AC ) द्यावे लागणार आहे.

OLA UBER Charge Extra Fee For AC
OLA UBER Charge Extra Fee For AC
author img

By

Published : Mar 28, 2022, 6:43 PM IST

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात उष्णता ( Heat Wave Increase In Mumbai ) वाढली आहे. त्यामुळे उन्हाळाच्या चटकेपासून बचावासाठी वातानुकूलित वाहनाचा आसरा मुंबईकर घेत आहे. मात्र, ओला-उबेर ( Ola Uber Cab ) चालकांकडून मुंबईकरांची लूट होताना दिसून येत आहे. उबेरमध्ये एसी लावयाचा असेल, तर प्रवाशांना अतिरिक्त शुल्क ( Ola Uber Extra Charge For AC ) द्यावे लागणार आहे. याबाबद एका महिला प्रवाशांने तक्रार सुद्धा कंपनीकडे केली आहे.

हैदराबादमध्ये 'NO AC' मोहीम - अँप बेस्ट टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या ओला आणि उबेरचा टॅक्सी पुन्हा एकदा वादाचा भोऱ्यात अडकली आहे. ओला-उबेर टॅक्सी चालकांना वाढत्या इंधन दरवाढीमुळे मोठे नुकसान होत आहे. त्यातच आता भर उन्हाळ्यात प्रवाशांना एसी सेवा जुन्या भाड्याप्रमाणे देणे शक्य नाही. त्यामुळे एसी सेवेसाठी प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे ओला-उबेर चालकांकडून उकळण्याची सुरुवात केली आहे. याबाबत अनेक तक्रारी प्रवाशांनी कंपनीकडे केल्या आहे. हैदराबादमध्ये उद्यापासून 'NO AC' मोहीम राबवली जाणार आहे. सोबतच भाडेवाढीसाठी आंदोलन सुद्धा करण्यात येणार आहे. सध्या तेलंगणामध्ये डिझेलचा दर ९८. १० प्रति लिटर परिवहन विभागाने पाऊल उचलणे आवश्यक आहे. सध्या, प्रति किमी १२ ते १३ रुपये पेक्षा कमी आहे. चालकांना एसी चालू करण्यासाठी किमान २४-२५ प्रति किमी हवे आहे.

मुंबईत एसीसाठी अतिरिक्त पैसे - तेलंगणा सारखी ओला-उबेर टॅक्सी चालकांची परिस्थिती महाराष्ट्र्रात सुद्धा आहेत. मुंबईत सुद्धा ओला-उबेर टॅक्सीत एसी लावयाचा असेल तर अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल, असे एका उबरचालकाने महिला प्रवाशांला सांगितले आहे. या महिला प्रवाशांने उबर टॅक्सीत एसी दराचे लावलेल्या फलकाचा फोटो ट्विट केला आहे. या फलकात दाखवले गेले आहे की, २५ किलोमीटर्यंतच्या प्रवासासाठी ५० रुपये आणि ५० किलोमीटरच्या प्रवासासाठी १०० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. उबरवाल्याने एसीचे अतिरिक्त पैसे मागितल्यानंतर या महिला प्रवाशांनी आपली ट्रीपच रद्द केली. ओला-उबेर मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, ओला-उबेर टॅक्सी चालक एसीसाठी अतिरिक्त शुल्क घेत नाही आहे. नियमानुसार जे शुल्क आहे तेच आकारण्यात येत आहेत.

हेही वाचा - IPS Ramya Rides Bicycle In Midnight : मध्यरात्री 9 किमी साईकल चालवून महिला आयपीएसकडून तपासणी; सर्व स्तरातून कौतूक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.