ETV Bharat / city

मानखुर्दमध्ये मुलाला मारल्याच्या शुल्लक कारणावरून महिलेवर चाकूहल्ला - women stabbed in mumbai

याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी दोन पुरुषांसहित दोन महिलांना अटक केली आहे.

मानखुर्द पोलीस ठाणे
author img

By

Published : Aug 26, 2019, 9:43 AM IST

मुंबई - घराबाहेर खेळणाऱ्या एका १० वर्षांच्या मुलाला शेजाऱ्याने मारल्याचा जाब विचारला असता २ कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. हा वाद विकोपाला जाऊन मुलाच्या आईवर एका तरुणाने चाकूने वार करून जखमी केले आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी दोन पुरुषांसहित दोन महिलांना अटक केली.

खारघर नवी मुंबई येथील रहिवासी पूनम टाक या आपल्या 10 वर्षाच्या मुलासह मानखुर्द येथे नातेवाईकाकडे आल्या होत्या. पूनम टाक यांचा मुलगा घराबाहेर खेळत होता. यावेळी शेजारी राहणाऱ्या अमित कजानिया याने मुलाला मारल्याने तो रडत घरी आला. यावेळी पूनम यांनी का मारले विचारायला गेले असता दोन कुटुंबात जोरदार भांडण सुरू झाले.

धक्काबुक्की चालू असताना आरोपी अमित घरात गेला आणि चाकू आणून पूनम यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या. त्यानंतर जखमी पुनम यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी अमित कजानिया, रवी कजानीया व अमितच्या कुटुंबातील दोन महिला राजेन्द्री कजानिया, मधू कजानिया यांना अटक केली आहे. पुढील तपास मानखुर्द पोलीस करीत आहेत.

Intro:मानखुर्दमध्ये मुलाला मारल्याच्या शुल्लक कारणावरून महिलेवर चाकूहल्ला

घराबाहेर खेळणाऱ्या एका दहा वर्षाच्या मुलाला शेजाऱ्याने मारले याचा जाब विचारला असता दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली व वाद विकोपाला जाऊन मुलांच्या आईवर एका तरुणाने चाकूने वार करून जखमी केले आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी दोन पुरुषासहित दोन महिलांना अटक केली आहेBody:मानखुर्दमध्ये मुलाला मारल्याच्या शुल्लक कारणावरून महिलेवर चाकूहल्ला

घराबाहेर खेळणाऱ्या एका दहा वर्षाच्या मुलाला शेजाऱ्याने मारले याचा जाब विचारला असता दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली व वाद विकोपाला जाऊन मुलांच्या आईवर एका तरुणाने चाकूने वार करून जखमी केले आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी दोन पुरुषासहित दोन महिलांना अटक केली आहे.

खारघर नवी मुंबई येथील रहिवासी पूनम टाक या आपल्या 10 वर्ष्याच्या मुलासह मानखुर्द येथे नातेवाईकाकडे काल आल्या होत्या. पूनम टाक यांचा मुलगा घराबाहेर खेळत होता. यावेळी शेजारी राहणाऱ्या अमित कजानिया याने मुलाला मारल्याने तो रडत घरी आला .यावेळी पूनम यांनी का मारले विचारायला गेले असता दोन कुटुंबात जोरदार भांडण सुरू झाले धक्काबुक्की चालू असताना आरोपी अमित घरात गेला आणि चाकू आणून पूनम यांच्या डोक्यावर वार केला.जखमी पुनम याना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
या प्रकरणी मानखुर्द पोलिसानी अमित कजानीया,रवी कजानीया,व अमितच्या कुटुंबातील दोन महिला राजेन्द्री कजानीया,मधू कजानीया याना अटक केली आहे. पुढील तपास मानखुर्द पोलीस करीत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.