ETV Bharat / city

Solapur Honeytrap Case : सोलापूरच्या बड्या नेत्याला हनीट्रॅपच्या माध्यमातून 2 कोटींची मागणी; मुंबईत गुन्हा दाखल

हनीट्रॅपचे प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. असाच प्रकार सोलापूरमध्ये घडला आहे. सोलापूरच्या राष्ट्रीय नेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा ( Honeytrap case solapur ) प्रयत्न झाला.

हनीट्रॅप प्रकरण
हनीट्रॅप प्रकरण
author img

By

Published : Jul 8, 2022, 6:55 AM IST

मुंबई- मुंबईत एका महिलेने एक राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याविरोधात हनीट्रॅप लावल्याची ( Solapur Honeytrap case ) धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नेत्याने दिलेल्या तक्रारीनुसार एका महिला विरोधात ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल ( Oshiwara police station ) करण्यात आला आहे.

तक्रार करणारा आरोपी हा एक राष्ट्रीय पक्षाचा नेता ( Solapur National Party leader ) आहे. सोलपूरमधील राहणारा नेता आहे. त्याने तक्रारीत आरोपी महिला ही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भिती दाखवत मुंबईत घर व 2 कोटी रुपयांची मागणी करत असल्याचे म्हटले ( solapur leader complaint honeytrap ) आहे. विशेष म्हणजे या नेत्याकडून आरोपी महिलेने या पूर्वी टप्याटप्प्याने 1 लाख 78 हजार फोन पे व 2 लाख रुपये रोखीने स्विकारल्याचे आरोप केले आहे. एवढ्यावरच न थांबता महिलेने नेत्याला बोलावून राजकीय व सामाजिक स्तरावर बदनामी करण्याची धमकीही दिली आहे. आरोपी महिला ही राजकिय नेत्याची नातेवाईक आहे. या नेत्याने दिलेल्या तक्रारीनुसार महिले विरोधात मुंबईच्या अंबोली पोलीस ठाण्यात भादवी कम 384, 341, 504 अंतर्गग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.

अहमदनगरमध्ये हनीट्रॅपचा प्रकार- अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा हनी ट्रॅपचा ( Honeytrap Case ) प्रकार जूनमध्ये समोर आला होता. एका श्रीमंत बागायतदाराकडून उसनवारी घेतलेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने बोलवत महिलेने अश्लिल व्हिडिओ आणि फोटो काढले होते. त्यानंतर बागायतदाराला लाखोंनी लुटत ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना शिर्डीत ( Honeytrap Case in Shirdi ) घडली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेस ताब्यात घेतले आहे. तर त्यानंतर दुसऱ्या आरोपीसही अटक करण्यात आली आहे. 2018 साली पीडीत बागायतदाराने आरोपी अनिता गोसावी यांना काही रक्कम उसनवारी दिली होती.

अहमदनगरमध्ये असा घडला होता हनीट्रॅप- संबधित महिला उसनवारी घेतलेले पैसे देण्यास टाळाटाळ करत होती. तगादा लावल्याने अखेर एक दिवस पैसे परत करण्याच्या बहाण्याने आरोपी महिलेनं पीडित बागायतदाराला राहाता तालुक्यातील बाभळेश्वर याठिकाणी बोलवले. रस्त्यावर पैसे कसे मोजणार म्हणून एक हॉटेलच्या रुममध्ये नेले. आरोपी महिलेने स्वतःचे वस्त्र काढून टाकले. याचवेळी पाठीमागून आलेल्या आरोपी राजेंद्र गिरी याने संबधित घटनेचे चित्रीकरण आणि छायाचित्र काढले. त्यानंतर दोघांनी मिळून पीडित व्यक्तीकडे रकमेची मागणी करण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाही तर संबंधित व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. पीडित व्यक्तीने अब्रूला घाबरत सुरुवातील 40 लाख 50 हजार रुपये दिले. मात्र त्यानंतर देखील ब्लॅकमेलिंगचा सिलसिला सुरुच राहिला.

हेही वाचा-Honeytrap Case in Shirdi : शिर्डीमध्ये 40 लाखांचा हनीट्रॅप

हेही वाचा- हनीट्रॅप : पहिले प्रेम मग शारीरिक संबंध त्यानंतर बलात्काराच्या नावावर खंडणी मागणाऱ्या नववधूला ठोकल्या बेड्या

हेही वाचा-तरुणीच्या नावाने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'हनीट्रॅप', दिल्लीच्या डॉक्टरला दोन कोटींचा गंडा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.