मुंबई - धनंजय मुंडे खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिलेला किला न्यायालयात ( Kila Court ) ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या महिलेने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्याकडे ५ कोटीची खंडणी मागितली होती. पोलिसांनी या महिलेला अटक करून किला कोर्टात हजर केले होते.
काय आहे प्रकरण - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी रात्री मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल (Dhananjay Munde File Complaint against Woman ) केला होता. याप्रकरणी धनंजय मुंडे यांना धमकी देणाऱ्या महिलेला इंदौर येथून अटक करण्यात आली होती. या महिलेने फोनच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल करु, अशी धमकी दिली होती. धनंजय मुंडे यांना मिळालेल्या या धमकीनंतर त्यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा - Dhananjay Munde Extortion Complaint : मंत्री धनंजय मुंडे यांची महिलेविरोधात खंडणीची तक्रार; पाच कोटी मागितले