ETV Bharat / city

Bharat Jodo Abhiyan : "भारत जोडो" अभियान राबवून काँग्रेसला नव संजीवनी मिळेल का?

काँग्रेसचा विचार पुन्हा एकदा जनसामान्यात रुजावा यासाठी काँग्रेसकडून "भारत जोडो" ( Bharat Jodo Abhiyan) अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसच्या सर्व शीर्ष नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम राबवला जाणार आहे.  तसेच हे अभियान महाराष्ट्रातही राबवले जाणार असून यासाठी 100 दिवसाचा कृती कार्यक्रम राबवला जाणार आहे.

Bharat Jodo Abhiyan
"भारत जोडो" अभियान राबवून काँग्रेसला नव संजीवनी मिळेल का?
author img

By

Published : Jul 24, 2022, 10:51 AM IST

मुंबई - काँग्रेस हा देशातला सर्वात जुना पक्ष आहे या पक्षाचे सरकार सर्वात जास्त वेळा देशामध्ये होते. तरीही आज काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. 2014 नंतर सत्तेत आलेल्या मोदी सरकारमुळे काँग्रेस अधिकच अडचणीत आले. यानंतर अनेक राज्यात असलेली काँग्रेसची सत्ता काँग्रेसला टिकवता आलेली नाही. अशा परिस्थिती पुन्हा एकदा काँग्रेस उभारी घेण्याचे अनेक प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप तरी या प्रयत्नांना यश आलेले दिसत नाही. काँग्रेसचा विचार पुन्हा एकदा जनसामान्यात रुजावा यासाठी काँग्रेसकडून "भारत जोडो" ( Bharat Jodo Abhiyan) अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे.

राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सर्व शीर्ष नेत्यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो कार्यक्रम राबविला जाणार आहे. तसेच हे अभियान महाराष्ट्रातही राबवले जाणार आहे. यासाठी 100 दिवसाचा कृती कार्यक्रम राबवला जाणार आहे. महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, जीवनावश्यक वस्तूवरील वाढता जीएसटी कर या विरोधात या अभियानातून जनजागृती केली जाणार असल्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole) यांनी सांगितल आहे.

"भारत जोडो" अभियान राबवून काँग्रेसला नव संजीवनी मिळेल का?

अशी करणार अभियानाला सुरुवात - येत्या 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यभराच्या प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसकडून पदयात्रा काढल्या जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जवळपास 75 किलोमीटरची पदयात्रेचा आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेच्या विरोधात घेतलेल्या निर्णयाबाबत जनजागृती केली जाईल असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले. 2 ऑक्टोबर पासून भारत जोडो अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबवले जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधात केला जाणारा अपप्रचार, माहिती तरुणांपुढे नेली जात असून खरा इतिहास तरुणांपर्यंत नेला जाणार आहे. 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात याबाबतचे भव्य कार्यक्रम काँग्रेसकडून राबवले जातील. तसेच गाव तिथे काँग्रेस हा मंत्र डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस कामाला लागेल. जेणेकरून सर्वसामान्य जनता काँग्रेस सोबत पुन्हा जोडली जाईल. त्यामुळे काँग्रेसच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा यश येईल का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेस सर्वसामान्यपासून दुरावली - मात्र काँग्रेसचा हा अत्यंत केविलवाणा प्रयत्न आहे. अशा कोणत्याही अभियानाने थेट जनतेशी जोडता येत नाही. काँग्रेसने जनतेचा विश्वास गमावलेला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तो विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे शीर्ष नेते करत नाहीत. त्यामुळे असे कितीही अभियान घेतली तरी काँग्रेसला पुन्हा संजीवनी मिळणार नाही असं स्पष्ट मत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके ( Bharatiya Janata Party spokesperson Ganesh Hake ) यांनी व्यक्त केल आहे. तसेच काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. पक्षाकडे कोणताही कार्यक्रम नाही. अशा परिस्थितीत काँग्रेस अडकली असून, सध्या तरी असे अभियान राबवून काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार नाही असा चिमटा ही गणेश आहे यांनी काढला आहे.

हेही वाचा :Raj Thackeray :आज बाळासाहेब असते तर?.. राज ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.