ETV Bharat / city

पंधरा दिवसांत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सीईटी परीक्षा घेणार - वर्षा गायकवाड - 11 th admission cet

शिक्षण विभागाकडून अकरावीच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटीच्या परीक्षा पुढील पंधरा ते वीस दिवसांत घेतल्या जातील अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. सीईटी परीक्षा पूर्णत: ऐच्छिक असणार आहे. मात्र सीईटी परीक्षा पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

पंधरा दिवसांत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सीईटी परीक्षा घेणार - वर्षा गायकवाड

author img

By

Published : Jul 17, 2021, 5:42 PM IST

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागल्यानंतर आता महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू होईल. यासाठी शिक्षण विभागाकडून अकरावीच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटीच्या परीक्षा पुढील पंधरा ते वीस दिवसांत घेतल्या जातील अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. सायन येथे काँग्रेसच्या एका कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सीईटी परीक्षा पूर्णत: ऐच्छिक असणार आहे. मात्र सीईटी परीक्षा पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. सीईटी परीक्षेसाठी दोन तासांचा वेळ विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचेही शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.

संकेतस्थळावरून दहा लाख विद्यार्थ्यांनी निकाल केले डाउनलोड
निकालाच्या संकेतस्थळावर जाऊन आत्तापर्यंत दहा लाख विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक डाऊनलोड केले आहे. उर्वरित पाच लाख विद्यार्थ्यांना आज आपले गुणपत्रक डाऊनलोड करता येणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. काल एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट दिल्याने संकेतस्थळ हँग झाले. मात्र यासंबंधी चौकशीचे आदेश आपण दिले असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शुल्क वाढीविरोधात अध्यादेश काढणार
काही शाळा जाणीवपूर्वक शालेय शुल्क वाढवत आहेत. त्यामुळे शुल्क वाढीबाबत लवकरच अध्यादेश काढणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असून काही सूचना मांडण्यात आल्या आहेत असेही वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

हेही वाचा - मोदी-पवार भेटीविषयी चुकीच्या वावड्या उठवल्या जात आहेत, नवाब मलिकांचे स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.