ETV Bharat / city

मुंबईत साथीच्या रोगांचा मोठा फैलाव, मलेरिया डेंग्यू गॅस्ट्रो स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांत वाढ

मुंबईत यंदा पावसाळा संपत आला असताना या साथीच्या आजारात वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची मोठी नोंद झाली आहे. पावसाळी आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

मुंबईत साथीच्या रोगांचा मोठा फैलाव
मुंबईत साथीच्या रोगांचा मोठा फैलाव
author img

By

Published : Sep 6, 2022, 3:31 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये पावसाळा सुरु झाल्यावर पावसाळी आजार डोके वर काढतात. यंदा पावसाळा संपत आला असताना या साथीच्या आजारात वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची मोठी नोंद झाली आहे. पावसाळी आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

रुग्णसंख्येत वाढ - मुंबईमध्ये ४ सप्टेंबरपर्यंत आठवडाभरात मलेरियाचे ८९ रुग्ण, लेप्टोचे ६, डेंग्यूचे २९, गॅस्ट्रोचे ३८, हेपेटायसिसचे ४, चिकनगुनियाचा १ तर एच १ एन १ म्हणजेच स्वाईन फ्लूच्या ३ रुग्णांची नोंद झाली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये मलेरियाचे ७८७ रुग्ण, लेप्टोचे ६३, डेंग्यूचे १६९, गॅस्ट्रोचे ४६७, हेपेटायसिसचे ५१, चिकनगुनियाचे ३ तर एच १ एन १ च्या १८९ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी सप्टेंबर २०२१ मध्ये मलेरियाचे ६०७ रुग्ण, लेप्टोचे ४६, डेंग्यूचे २५६, गॅस्ट्रोचे २४५, हेपेटायसिसचे २८, चिकनगुनियाचे ७ तर एच १ एन १ च्या ९ रुग्णांची नोंद झाली होती. मागील सप्टेंबर महिन्यात हेपेटायसिस मुळे १ रुग्णाचा मृत्यू झाला होता.

या आजारामुळे झाले मृत्यू - २०१९ मध्ये लेप्टोमुळे ११, डेंग्यू मुळे ३, हेपेटायसिसमुळे १, तर स्वाईन फ्लुमुळे ५ अशा एकूण २० जणांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये मलेरियमुळे १, लेप्टोमुळे ८, डेंग्यूमुळे ३ अशा एकूण १२ जणांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये मलेरियमुळे १, लेप्टोमुळे ६, डेंग्यूमुळे ५, हेपेटायसीसमुळे १ असा एकूण १३ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२० मध्ये यावर्षी आतापर्यंत मलेरियाने १, लेप्टोने १, डेंग्यूने २ तर एच १ एन १ ने २ अशा ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

अशी घ्या काळजी - मुंबईमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ताप, खोकला, घशात खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, डायरिया, उलटी अशी लक्षणे असलेल्या नागरिकांनी त्वरित उपचार करून घ्यावेत. शिंकताना आणि नाक पुसण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा. नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून घ्यावे. हात साबणाने, पाण्याने स्वच्छ धुवावेत. डोळे नाक आणि तोंड यांना हात लावू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. मोठ्या प्रमाणात ताप आला असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, त्वचा, डोळे, ओठ पडल्यास त्वरित पालिकेच्या रुग्णालयात उपचार करून घ्यावे अन्यथा त्याचा मृत्यू होऊ शकतो असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्ल्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून पुढेही रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूच्या चाचण्या करण्यात येणार असून तसे निर्देश खाजगी रुग्णालयांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - WEATHER REPORT : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.