ETV Bharat / city

Diwali 2021 : धनत्रयोदशीला का करतात दागिने आणि भांड्यांची खरेदी? काय आहे त्याचे महत्त्व? जाणून घ्या... - धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात

2 नोव्हेंबरपासून म्हणजेच धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. या दिवशी दागिने आणि भांड्यांची खरेदी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धनवंतरी आणि देवी लक्ष्मीच्या पूजेसोबतच देवतांचे खजिनदार कुबेर यांचीही पूजा केली जाते.

Dhantrayodashi
Dhantrayodashi
author img

By

Published : Nov 2, 2021, 6:00 AM IST

हैदराबाद - यंदा 2 नोव्हेंबरपासून म्हणजेच धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. याच दिवशी भगवान धनवंतरी यांनी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला वैद्यकीय शास्त्राचा प्रसार करण्यासाठी अवतार घेतला होता, म्हणूनच हा सण 'धनत्रयोदशी' म्हणून ओळखला जातो.

दागिने आणि भांड्यांची करतात खरेदी -

भगवान धनवंतरी हे विष्णूचे रूप मानले जाते. भगवान धनवंतरी हे वैद्यकीय शास्त्राचे प्रमुख देवता आहेत. तसेच दिवाळीची सुरुवात याच दिवसापासून होते. त्यामुळे हा दिवस धुमधडाक्यात साजरा करतात. या दिवशी दागिने आणि भांड्यांची खरेदी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धनवंतरी आणि देवी लक्ष्मीच्या पूजेसोबतच देवतांचे खजिनदार कुबेर यांचीही पूजा केली जाते. दिवाळीच्या पूजेसाठी या दिवशी लक्ष्मी-गणेशाची मूर्तीही घरात आणतात.

भगवान धनवंतरीच्या पूजेचे महत्त्व -

शास्त्रानुसार भगवान धनवंतरी त्रयोदशीला समुद्रमंथनाच्या वेळी प्रकट झाले होते म्हणून या दिवसाला धनत्रयोदशी म्हणतात. ऐश्वर्य आणि वैभव देणारी ही त्रयोदशी विशेष महत्त्वाची मानली जाते. महासागरमंथनाच्या वेळी अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तूंव्यतिरिक्त शरद पौर्णिमेचा चंद्र, कार्तिक द्वादशीला कामधेनू गाय, त्रयोदशीला धन्वंतरी आणि कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला भगवती लक्ष्मी समुद्रातून अवतरली होती, असे म्हणतात. यामुळेच दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजन आणि त्रयोदशीच्या दोन दिवस आधी भगवान धनवंतरीचा जन्मदिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो.

भगवान धनवंतरीला पितळ प्रिय आहे -

भगवान धनवंतरी हे नारायण भगवान विष्णूचे रूप मानले जातात. त्यांना चार हात आहेत. ज्यात त्यांनी शंख आणि चक्र धारण केलेले आहेत. इतर दोन हातात ते अमृताचे भांडे आणि औषध आहेत. त्यापैकी अमृत कलश हे पितळेचे बनलेले आहे. कारण पितळ हा भगवान धनवंतरींचा प्रिय धातू आहे. मान्यतेनुसार या दिवशी खरेदी केलेली कोणतीही वस्तू शुभ फळ देते आणि दीर्घकाळ टिकते.

संध्याकाळी लावतात दिवे -

धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लावण्याचीही परंपरा आहे. कुटुंबात अकाली मृत्यू टाळण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी दिवा लावला जातो. त्याला यम दीपक म्हणतात. हा दिवा यमराजासाठी लावला जातो. यामुळे अकाली मृत्यू टाळता येतो, असे मानले जाते.

Diwali 2021 : पुण्यातील 'ही' बेकरी तयार करते पर्यावरणपूरक 'चॉकलेटचे फटाके'!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.