ETV Bharat / city

महाराष्ट्रातील सगळी काम आदित्य ठाकरे यांच्या गँगलाच का?, नितेश राणेंचा सवाल - नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी रविवारी एक ट्विट करत डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केलेले आहेत. या ट्विटमध्ये नितेश राणे यांनी लिहिले आहे, की जगातली कोणतीही वस्तू बनवायची असेल तर ती डिनो मोरिया आणि कदम हे दोघेच बनवू शकतात.

Nitesh Rane on Aditya Thackeray
Nitesh Rane on Aditya Thackeray
author img

By

Published : Mar 15, 2021, 6:46 PM IST

Updated : Mar 15, 2021, 6:52 PM IST

मुंबई - भाजपचे आमदार नितेश राणे यांनी रविवारी एक ट्विट करत डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केलेले आहेत. या ट्विटमध्ये नितेश राणे यांनी लिहिले आहे, की जगातली कोणतीही वस्तू बनवायची असेल तर ती डिनो मोरिया आणि कदम हे दोघेच बनवू शकतात. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिक्टोरिया बग्गीचे कामसुद्धा UFO या कंपनीला दिलेले आहे आणि ही कंपनी डिनो मोरिया आणि कदम या दोघांची आहे. विशेष म्हणजे दोघेही आदित्य ठाकरे यांचे खास मित्र आहेत. त्यामुळे कोणतेही काम हे आदित्य ठाकरे यांच्या मित्र परिवारालाच दिली जातात आणि बाकीचे सगळे उपाशी राहतात आणि बाकीच्यांना हे काम करता आलं नसतं का, असा सवाल या ट्विटमधून नितेश राणे यांनी विचारला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे
या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं की, आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मित्र परिवारातील जी काही निवडक मंडळी आहेत त्यातील डिनो मोरिया आणि वरूण सरदेसाई आणि कदम या तिघांच्या कंपनीला सर्व टेंडर दिली जातात आणि त्यांच्याकडूनच ही कामे केली जातात. त्यामुळे या सरकारची कामे करण्याची जी पद्धत आहे ती संशयाची आहे. खरं तर हा माझा आरोप आहे, की सरकार या सगळ्यांना पाठीशी घालत आहे. त्यात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांना प्रामुख्याने पाठीशी घालतात. त्याचं कारण असं आहे की, त्यांचे पारिवारिक संबंध आहेत आणि मी जे काल ट्विट केलेलं होतं ते त्याच अनुषंगाने केलेलं होतं.नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते वरूण सरदेसाई यांच्यावरती त्यांनी टीका आणि आरोप केले आहेत की, वरूण सरदेसाई आणि सचिन वाझे यांचे आर्थिक गैरव्यवहार होते. त्यांनी एकमेकांशी भरपूर वेळा संपर्क साधलेला होता आणि त्यांच्या सीडीआर चौकशीची मागणी आम्ही करत आहोत. त्यांची चौकशी एनआयएकडून व्हावी, अशी आमची मागणी आहे. असे नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Last Updated : Mar 15, 2021, 6:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.