ETV Bharat / city

भाजपचे सुडाचे राजकारण -गृहमंत्री देशमुखांचा निशाणा

ईडी कार्यालयाकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना चौकशीच्या नोटीस मिळण्याच्या प्रकरणावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजपाने सु़डाचे राजकारण करू नये असेही ते म्हणाले आहेत.

speaks against BJP
गृहमंत्री अनिल देशमुख
author img

By

Published : Dec 30, 2020, 12:43 PM IST

Updated : Dec 30, 2020, 1:43 PM IST

मुंबई - ईडीच्या आडून भाजप सूडाचे राजकारण करत असून ही गंभीर बाब आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. नव वर्षाचे स्वागत करताना जमावबंदी आदेश लागू आहेत, त्याचे पालन करा, असेही देशमुख यांनी आवाहन केले आहे.

भाजपा विरोधात बोलल्यास इडीची नोटीस -

भाजप नेत्यांच्या विरोधात किंवा धोरणाविरोधात बोलल्यावर लगेच ईडीची नोटीस पाठवण्यात येते. हेच काम सुरुवातीला सीबीआय करत होते. परंतु राज्यात चौकशी करायची असेल तर राज्यसरकारची परवानगी घ्यावी लागेल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे सीबीआयबाबत आता केंद्र काही करु शकत नाही, अशी माहितीही अनिल देशमुख यांनी दिली. ईडीचा ज्यापध्दतीने राजकारणासाठी वापर होतोय. ते पाहून अशा प्रकारचं राजकारण देशात कधी पाहण्यात आले नाही, अशी खंतही अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.

ईडी प्रकरणावरून गृहमंत्री देशमुखांची टीका

जमावबंदी आदेशाचे पालन करा -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जमावबंदी लागू केली आहे. एका जागी पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी आहे. त्यानंतरही लोक जमतात अशा ठिकाणी गर्दी होत आहे. उद्या नव वर्षांचे स्वागत करताना जमावबंदी आहे, एका ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाही या नियमांचे पालन करा असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

गृहमंत्री देशमुखांचा निशाणा

Last Updated : Dec 30, 2020, 1:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.