ETV Bharat / city

Yakub Memon कोण होता याकूब मेमन, काय होते आरोप ? - 1993 mumbai blast

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट (1993 mumbai blast) प्रकणातील मुख्य आरोपी याकूब मेमन (yakub memon) कबरी वरील (yakub memon grave controversy) सजावट प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्फोटामध्ये 257 जणांचा मृत्यू झाला होता. 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (underworld don daud ibrahim) अद्यापही फरार आहे. याकूब मेमन या प्रकरणातील मुख्य आरोपी होता. त्याला फाशी दिल्यानंतर, त्याची मरीन लाईन पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या बडा कब्रस्तानमध्ये कबर बांधण्यात आली. जाणून घेऊयात याकूब मेमनबद्दल (know about yakub memon) सविस्तर

Yakub Memon
कोण होता याकूब मेमन, काय होते आरोप ?
author img

By

Published : Sep 8, 2022, 9:02 PM IST

मुंबई 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट (1993 mumbai blast) प्रकणातील मुख्य आरोपी याकूब मेमन (yakub memon) कबरी वरील (yakub memon grave controversy) सजावट प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्फोटामध्ये 257 जणांचा मृत्यू झाला होता. 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (underworld don daud ibrahim) अद्यापही फरार आहे. याकूब मेमन या प्रकरणातील मुख्य आरोपी होता. त्याला फाशी दिल्यानंतर, त्याची मरीन लाईन पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या बडा कब्रस्तानमध्ये कबर बांधण्यात आली. जाणून घेऊयात याकूब मेमनबद्दल (know about yakub memon) सविस्तर

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट 12 मार्च 1993 मुंबई नेहमीप्रमाणेचं घड्याळाच्या काट्यावर धावत होती. पण अचानक एका पाठोपाठ एक 12 स्फोट झाले आणि मुंबई थांबली. हा दिवस मुंबईकर कधीच विसरु शकणार नाहीत. दहशतवाद्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवले. या जखमा अजूनही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. हा दिवस आठवताच मुंबईकरच नाही तर अवघ्या देशवासियांच्या अंगावर काटा येतो. मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटानं अवघ्या देशाला हादरवलं. देशातील हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट होता. या हल्लात 257 जणांचा मृत्यू झाला होता तर 700 हून अधिकजण या स्फोटात जखमी झाले होते. या भयान हल्ल्याच्या कटू आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात आहेत. या बॉम्बस्फोटात अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं. अनेक निष्पाप बळी गेले.

सुत्रधार होता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मुख्य आरोपी याकूब मेमन मुंबई हादरवणाऱ्या या हल्ल्यामागचा सुत्रधार होता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम. या हल्ल्यामागे दाऊदचा संबंध असल्याचं समोर आलं. पण याप्रकरणातील सर्व आरोपी फरार झाले. त्यामध्ये एक कुटुंब होतं. ते म्हणजे मेमन कुटुंब. मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार टायगर मेमनचं कुटुंब. टायगर मेमन (tiger memon) आणि याकूब मेमन दोघं भाऊ. यांचा या बॉम्बस्फोटाच्या कटामागे हात होता. बॉम्बस्फोटानंतर हे दोघे भाऊ आपल्या कुटुंबासह फरार झाले. 12 मार्च 1993 च्या बॉम्बस्फोटाआधी मुंबईतील माहिम परिसरातील अल हुसैनी इमारतीत टायगर मेमन हा आई-वडील आणि याकूब या आपल्या लहान भावासोबत राहत होता. मुंबई बॉम्बस्फोटच्या कटानुसार टायगर मेमनने याकूब मेमनसोबत कुटुंबातील सर्व सदस्यांना भारताबाहेर पाठवलं. कुटुंबातील सगळेच जण पहिल्यांदा दुबईला त्यानंतर सौदी आणि शेवटी पाकिस्तानात गेले.

जावाजावांच्या भांडणात याकूब लटकला फासावर असं सांगितलं जातं की टायगर मेमनची पत्नी आणि याकूबची पत्नी यांच्यात सारखे खटके उडायचे. फरार झाल्यानंतर या खटक्यांचं प्रमाण आणखी वाढलं होतं. याकूबची पत्नी दररोज टायगर आणि त्याच्या पत्नीची याकूबकडे तक्रार करत असे. तुमच्या भावामुळे आपल्याला हे दिवस पाहावे लागत आहेत. आपण आपल्या नातेवाईकांपासूनही दुरावलो. ना कुणाच्या लग्नसमारंभात जाऊ शकत ना कुणाच्या अंत्यसंस्काराला. याला आयुष्य म्हणायचं का? आता फक्त तुमच्या भावाच्या तुकड्यांवर आयुष्य काढावं लागेल. यामुळे त्रस्त झालेला याकूबनं भारतात परतण्याचा निर्णय घेतला. याकूबच्या या निर्णयामागे जावा-जावांमधील भांडण हेही एक कारण होतं. रोजच्या भांडणांपासून त्याला सुटका हवी होती आणि त्याने टायगर मेमनसोबत बंडखोरी करुन भारतात परतण्याचा निर्णय घेतला. मेमन कुटुंबाच्या एका निकटवर्तीयाच्या म्हणण्यानुसार जर जावा-जावांमध्ये भांडणं झाली नसती तर कदाचित याकूब भारतात येण्यासाठी तयार झालाच नसता.

भाऊ टायगर मेमन आणि अयूब मेमन यांना कराचीतच सोडून याकूब मेमन भारतात परतला. त्याच्यासोबत दोन भाऊ वगळता संपूर्ण कुटुंब होतं. 1994 साली नेपाळच्या काठमांडू विमानतळावरुन याकूबला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर याकूबला अटक करण्यात आली. याकूब पेशानं चार्टर्ड अकाऊंटंट होता. भायखाळयामध्ये लहानाचा मोठा झालेल्या याकूबनं कॉन्व्हेंट शाळेत इंग्रजी माध्यमातून त्याचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. अभ्यासात हुशार असलेल्या याकूबनं पुढे वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर पुढं त्यानं चार्टर्ड अकाउंटटच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. पुढे तो चार्टर्ड अकाउंटट झाला. त्यानं बॉम्बस्फोटावेळी पैसे आणल्याचा आरोप आहे. अटक झाल्यानंतर याकूबला आशा होती की बॉम्बस्फोटात मोठी भूमिका नसल्याने काही वर्षात सुटका होईल. पण तसं झालं नाही.

सध्या याकूबचे दोन भाऊ औरंगाबाद तुरुंगात आहेत. तर टायगर मेमनची पत्नी पुणे तुरुंगात आहे. दिल्लीत अटक केल्यानंतर पत्नी राहीन, भाऊ आणि नातेवाईकांविरोधात टाडाअंतर्गत खटला चालवला गेला. याकूबची पत्नी राहीन हिला कोर्टाने सोडून दिलं. मात्र याकूबला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. बॉम्बस्फोटासाठी ज्या 12 जणांना फाशीची शिक्षा सुनावली त्यापैकी एक याकूब मेमन. याकूबनं या कारस्थानात पैशांचे व्यवहार पाहण्यापासून दहशतवाद्यांना मदत करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. याकूबवरील हे आरोप न्यायालयात सिध्द झाल्यानं टाडा न्यायालयानं त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती.

याकूबला फाशीची शिक्षा (Yakub was sentenced to death) सुनावल्यानंतर याकूबनं राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली. राष्ट्रपतींनी 2013 साली त्याची दया याचिका फेटाळून लावली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात मध्यरात्री पार पडलेल्या सुनावणीत याकूबच्या फाशीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. 30 जुलै 2015 रोजी नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात बॉम्बस्फोटातील निष्पाप जीवांचा दोषी असलेल्या याकूब मेमनला फासावर लटकवण्यात आलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.