ETV Bharat / city

sandipan Bhumare : कारखान्यातील 'स्लिप बॉय' ते पुन्हा मंत्रीपदासाठी नाव चर्चेत; वाचा संदीपान भुमरेंचा थक्क करणारा प्रवास

शिंदे-भाजप सरकारचा मंत्रिमंडळ ( shinde bjp government expansion ) विस्तार होणार आहे. त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संदीपान भुमरे यांची पुन्हा एका मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता ( sandipan bhumare second time name cabinet minister ) आहे.

sandipan Bhumare
sandipan Bhumare
author img

By

Published : Aug 4, 2022, 7:53 PM IST

Updated : Aug 9, 2022, 7:17 AM IST

मुंबई - महाराष्ट्रात सत्तांतर होऊन एक महिना लोटला. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणखी काही झाला नाही. वारंवार या विषयाला घेऊन विरोधी पक्षासह अनेक राजकीय लोक टीका करत आहेत. तसेच, या मंत्रिमंडळाबाबत काही याचिका कोर्टातही आहेत. ( cabinet of Shinde government ) त्यावर आणखी निर्णय झालेला नाही. त्यामुळेही हा विस्तार रखडलेला आहे अशी चर्चा आहे. कोण होणार मंत्री? एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडलेल्या आमदारांपैकी शिंदे गटातून महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या आमदारांना संधी मिळणार आहे. त्यातील एक नाव म्हणजे संदीपान भुमरे.

पाचवेळा विधानसभेवर निवडून आलेले शिंदे गटातील बंडखोर आमदार संदीपान भुमरे हे ठाकरे सरकारमध्ये फलोत्पादन मंत्री होते. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह बंड केले आणि ठाकरे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. सत्तास्थापनेनंतर आता शिंदे-भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये शिवसेनेचे बंडखोर नेते संदीपान भुमरे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भुमरे यांच्या या राजकीय प्रवासावर टाकलेला हा प्रकाश.

कोण आहेत संदीपान भुमरे? - औरंगाबादमधील शिवसेनेचे दिग्गज नेते म्हणून संदीपान भुमरेंना ओळखलं जात. भुमरेंचा जन्म 13 जुलै 1963 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड बुद्रुकमध्ये झाला. त्यांचं शिक्षण इयत्ता दहावीपर्यंत झालं. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. 1995 पासून ते पैठण मतदारसंघातून सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदारपदी निवडून आले आहेत. ठाकरे सरकारमध्ये ते फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचे कॅबिनेट मंत्री होते.

कारखान्यात स्लिप बॉय ते चेअरमन - संदीपान भुमरे यांनी सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष केला. ते पैठणमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात स्लिप बॉय म्हणून काम करत होते. मात्र, त्यानंतर त्याच कारखान्याचे ते चेअरमन झाले. कारखान्यात काम करत असतानाच त्यांनी 1988 मध्ये पाचोडमध्ये शिवसेनेची शाखा स्थापन केली आणि राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1989मध्ये पाचोड ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अवघ्या तीन वर्षात त्यांनी पंचायत समितीचे उपसभातीपद मिळवले. पुढच्याच वर्षी म्हणजे 1993 साली ते संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक झाले.

भुजबळांची बंडखोरी आणि भुमरे आमदार - शिवसेनेचे तत्कालीन बडे प्रस्त असलेले छगन भुजबळ यांनी बंडखोरी केली. भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार बबनराव वाघचौरे यांनीही बंडखोरी केली होती. त्यामुळे 1995च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कोणाला द्यायची हे शिवसेनेत ठरत नव्हते. शिवसेनेचे नेते, दिवंगत मोरेश्वर सावे हे बाहेरचे उमेदवार असल्याने त्यांच्या नावाला विरोध होत होता. त्यामुळे भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली. भुमरे यांनी ही निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी 1999 आणि 2004 निवडणूकही जिंकली. संपूर्ण पैठण तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकवला.

पाचवेळा आमदार - संदीपान भुमरे हे सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले. मात्र, भुमरेंचा विजयरथ राष्ट्रवादीचे संजय वाघचौरे यांनी रोखला. 2009च्या विधानसभा निवडणुकीत वाघचौरे विजयी झाले आणि भुमरे पराभवाला सामोरे जावे लागले. पण, यादरम्यान भुमरे यांनी मतदारसंघ बांधणीवर जोर दिला आणि पुढे 2014 आणि 2019ची निवडणूक सहजपणे जिंकली. भुमरे हे 2019च्या विधानसभा निवडणुकीत पैठण मतदारसंघातून दणदणीत मतांनी विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे यांचा 14 हजार 139 मतांनी पराभव केला होता.

हेही वाचा - Cabinet Expansion Of Shinde Govt: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; वाचा संभाव्य मंत्रिमंडळाची यादी

Last Updated : Aug 9, 2022, 7:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.