ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव आहे? भाजप नेते आशिष शेलार यांचा सवाल

मुख्यमंत्री रात्री जनतेशी सवांद साधतात आणि एमपीएससी परीक्षेच्या तारखा का जाहीर करू शकत नाही? त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे हे त्यांनी स्पष्ट करावं. मुख्यमंत्री इतके हतबल झाले आहेत अशी टीका शेलार यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव आहे? भाजप नेते आशिष शेलार यांचा सवाल
मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव आहे? भाजप नेते आशिष शेलार यांचा सवाल
author img

By

Published : Mar 12, 2021, 1:49 PM IST

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी एमपीएससीच्या परीक्षेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री रात्री जनतेशी सवांद साधतात आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या तारखा का जाहीर करू शकत नाही? त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.

शेलार यांची टीका

सरकार मध्ये ताळमेळ नाही का? मुख्यमंत्र्यांवर दबाव कुणाचा आहे हे नक्की मुख्यमंत्र्यांनी सांगावं. कारण मुख्यमंत्री रात्री जनतेशी सवांद साधतात आणि एमपीएससी परीक्षेच्या तारखा का जाहीर करू शकत नाही? त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे हे त्यांनी स्पष्ट करावं. मुख्यमंत्री इतके हतबल झाले आहेत, त्यामुळे प्रशासनात खूप काही गडबड होत आहेत अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

विरोधी पक्ष आक्रमक
एमपीएससीच्या मुद्द्यावरून राज्यातील विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार राम सातपुते यांनी पुण्यात जाऊन आंदोलन केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीहीया निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या मुद्द्यावरून सरकारमध्येच संभ्रमाची स्थिती असल्याचे चित्र निर्माण झाले.

विद्यार्थ्यांमध्ये असंतोष

राज्य सरकारने कोरोनाचे कारण देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची(MPSC) रविवारी १४ मार्च रोजी होणारी परीक्षा सलग चौथ्यांदा पुढे ढकलताच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. राज्यात ठिकठिकाणी सरकारच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला. त्यामुळे काही ठिकाणी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमारही केला. पुणे, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, नागपूर, अमरावती, सांगलीमध्ये रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

हेही वाचा - आता मराठीतून ऐकायला येणार आयपीएलची कॉमेंट्री!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.