मुंबई - एकनाथ शिंदे बंड केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. बंडखोर आमदारांचा गट मध्यरात्री सुरत येथून गुवाहटीला गेले आहेत. ते काय करणार आणि राज्याच्या सरकारचे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना शिवसेनेने आता व्हिप जारी केला आहे. सध्याकाळी पाच वाजेपर्यंत परत अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहे.
सर्व आमदारांची बैठक वर्षा निवासस्थानी बैठक - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत 40 पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा केला आहे. या सर्व आमदारांनी परत यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआणि खासदार संजय राऊत यांनी कालपासून वेळोवेळी केला आहे. मात्र अद्याप त्यातील कोणीही आमदार परत आले नाही. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरी नंतर महा विकास आघाडी सरकार अल्पमतात आले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची बैठक वर्षा निवासस्थानी बोलावली आहे. याबाबतचं पत्रक शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी काढल असून, शिवसेनेच्या सर्व आमदारांना त्यांच्या अधिकृत ई-मेलद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवण्यात आला आहे. या बैठकीला कोणीही गैरहजर राहू नये अशा स्पष्ट सूचना या पत्रातून देण्यात आले आहेत. या बैठकीला अनुपस्थित राहिल्यास त्या सदस्यत्वचा स्वच्छेने सोडण्याचा इरादा असल्याचं स्पष्ट होईल असं पत्रात म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी पाच वाजता वर्षा निवासस्थानी बोलावलेली बैठक अत्यंत महत्त्वाची असून या बैठकीत उपस्थित असणारे मंत्री आणि आमदार शिवसेनेसोबत असते हे स्पष्ट चित्र होणार आहे.
महविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा - आज विकास आघाडीच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत देखील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली आहे. या बैठकीला काँग्रेसचे नेते कमलनाथ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. पुढील तीन दिवसात बंडखोरीचा क्षमेल आणि आमदार परत येतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस या सर्व परिस्थितीत वेट अँड वॉच ची भूमिका मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती आहे.