मुंबई - राज्यामध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे सरकार आलं ( Shinde Group And Bjp Maharashtra Government ) आहे. मात्र, आठ दिवस उलटून गेले तरी अद्याप या सरकारने आपले मंत्रिमंडळ जाहीर केलेले नाही. शिंदे गट आणि भाजपच्या पदरात कोणते नेते मंत्रीपदी असतील, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. तरी, दिल्ली दरबारी मंत्रिपदावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. अद्याप मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब झाला नसला तरी, दोन्ही गटाकडून संभाव्य खातेवाटप बाबत चर्चा केली जात ( Maharashtra Cabinet Expansion ) आहे.
महत्वाची खाती भाजपकडे? - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत खातेपदाबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त आणि महत्त्वाची खाती मिळावी यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत. तरी, मुख्यमंत्रीपद असल्याने महत्वाची खाती भाजपकडे ठेवण्यावर दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाचा कल अधिक असल्याचं समजत आहे. अर्थमंत्री, गृहमंत्री ऊर्जामंत्री गृहनिर्माण मंत्री यासारखी खाती आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही आहे. अमित शहांनंतर आज ( 9 जुलै ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब होईल, असे राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांचं मत आहे.
शिंदे गटाला मिळतील इतकी खाती - महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व महत्त्वाची खाती राष्ट्रवादीने आपल्याकडे ठेवली होती. मात्र, यावेळी महत्त्वाची खाती आपल्याकडे असावी, यासाठी राज्य सहित दिल्लीच्या भाजप नेत्यांनी आग्रह धरला आहे. एकूणच शिंदे गटाला 13 ते 14 खाती मिळण्याची शक्यता विश्लेषक वर्तवत आहेत. तर, तिथेच इतर खाती भाजप आपल्याकडे ठेवणार आहे.
'या' खात्यांसाठी भाजप आग्रही - भाजप गृहखात, अर्थ, सार्वजनिक बांधकाम खाते, गृहनिर्माण खाते, ऊर्जा खात, जलसंपदा खात, पाणीपुरवठा खात, पशुसंवर्धन व दुग्धविकास, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास खात, ग्रामविकास खात, उच्च व तंत्र शिक्षण आणि ओबीसी विकास खात आपल्याकडं ठेवण्यासाठी आग्रही आहे.
भाजपकडून 'या' नेत्यांना मिळणार संधी - भाजपकडून चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रविण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे, संभाजी पाटील निलंगेकर, मंगल प्रभात लोढा, संजय कुठे, रवींद्र चव्हाण, अशोक उईके, देवयानी फरांदे, अतुल सावे, जयकुमार रावळ, माधुरी मिसाळ हे कॅबिनेट मंत्री पद आपल्या पदरी पडावे यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, तिथेच प्रशांत ठाकूर, जयकुमार गोरे, मदन येरावार, प्रसाद लाड, राहुल कुल, गोपीचंद पडळकर, आणि बंटी बगाडिया हे सर्व राज्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे खातेवाटप आता कोणाच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपद आणि राज्यमंत्री पदाची माळ पडेल?, पहावे लागणार आहे.
शिंदे गटाला 'हे' खाती मिळण्याची शक्यता - शिंदे गटाला नगरविकास खाते, कृषी खाते, खनिकर्म खाते, वाहतूक खाते, पर्यावरण खाते, रोजगार हमी खाते, शालेय शिक्षण खाते, फलोत्पादन खाते, मृद व जलसंधारण खाते, सामाजिक न्याय खाते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे गटाकडून संजय शिरसाट, बच्चू कडू, दीपक केसरकर, उदय सामंत, गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार आणि शंभूराजे देसाई हे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. यापैकी शंभूराजे देसाई यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्य गृहमंत्री, उदय सामंत यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, गुलाबराव पाटील या जलसंपदा विभाग, दादा भुसे यांनी कृषी विभाग, संदिपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन अब्दुल सत्तार, बच्चू कडू या सर्वांना तीच खाती पुन्हा एकदा दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आपली खातं बदलण्यात यावे अशीही मागणी एकनाथ शिंदे गटातून काही माजी मंत्र्यांनी केली आहे. यामध्ये संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय खाते, दादा भुसे यांना जलसंपदा खाते, अब्दुल सत्तार यांना महसूल खाते मिळण्याची अपेक्षा आहेत. तर तिथेचं बच्चू कडू यांना स्वतंत्र अपंग मंत्रालय तयार करून त्याचं मंत्रिपद देण्यात यावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
तसेच, एकदा शिंदे गटांमध्ये असलेले सुहास कांदे, आशिष जयस्वाल, संजय राठोड, तानाजी सावंत, भरत गोगावले, यांनाही राज्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. त्यामुळे खाते वाटप करत असत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या गटातील अनेकांची मनधरणी करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - Krupal Tumane : आमदारांनंतर सेनेचे खासदार राजकीय धक्का देण्याच्या तयारीत?, खासदार तुमाने म्हणाले...