ETV Bharat / city

मुंबईतील शिक्षकांचे वेतन कधी होणार?, भाजपा शिक्षक आघाडीचा सवाल - mumbai marathi news

तांत्रिक अडचणीचे कारण देत अद्यापपर्यंत मुंबईतील शिक्षक-शिक्षकेतरांचे मार्च महिन्याचे वेतन न झाल्याने शिक्षक हवालदिल झाले आहेत. शिक्षकांचे वेतन तातडीने करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीने राज्य शासनाकडे केली आहे.

मुंबईतील शिक्षकांचे वेतन कधी होणार?, भाजपा शिक्षक आघाडीचा राज्य शासनाला सवाल

author img

By

Published : Apr 20, 2021, 7:58 PM IST

मुंबई - तांत्रिक अडचणीचे कारण देत अद्यापपर्यंत मुंबईतील शिक्षक-शिक्षकेतरांचे मार्च महिन्याचे वेतन न झाल्याने शिक्षक हवालदिल झाले आहेत. शिक्षकांचे वेतन तातडीने करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीने राज्य शासनाकडे केली आहे.

भाजपा शिक्षक सेलचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी याबाबत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री तसेच शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना निवेदन पाठवून मागणी केली आहे.

मुंबईतील शिक्षकांचे वेतन कधी होणार?, भाजपा शिक्षक आघाडीचा राज्य शासनाला सवाल

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (एन पी एस) च्या अंमलबजावणीचे कारण देत शिक्षकांचे पगार लटकले असून शिक्षकांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. मुंबईतील अनेक शिक्षक-शिक्षकेतर कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्या औषध उपचारासाठी पैश्याची अडचण निर्माण होत आहे. इन्कम टॅक्स मध्ये फेब्रुवारीचे अर्ध्याहून अधिक वेतन कपात झाल्याने व त्यातच मार्च महिन्याचे वेतन न झाल्याने गृह कर्जाचे हफ्ते व इतर कपाती न झाल्याने शिक्षकांना बँकांकडून दंड म्हणून व्याज आकारले जात आहे. अनेक जिल्ह्यातील संबंधित बँकांनी शिक्षकांना वेतन दिले त्याचप्रमाणे मुंबईतील शिक्षकांचे वेतन ज्या बँकेतून होते त्या बँकेने शिक्षकांना वेतन द्यावे अशी शिक्षकांकडून मागणी केली जात आहे.

हेही वाचा- राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण, लीलावती रुग्णालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.