मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (SGNP) एक बिबट्याचे पिल्लू 10 ऑक्टोबर रोजी आईपासून वेगळे झाले होते ते सुरक्षा कर्मचाऱ्यांना उद्यानाच्या सुरक्षा भिंतीपासून काही मीटर अंतरावर दिसले होते. जेव्हा सुरक्षा रक्षकांना कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी तात्काळ वन अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि बिबट्याच्या पिल्लाची सुटका केली. वैद्यकीय तपासणीनंतर, हे पिल्लू त्याच्या आई जवळ (Leopard Cub Reunited) सोडण्यात आले होते.
आईसोबत पुन्हा एकत्र - मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आईपासून विभक्त झालेल्या बिबट्याच्या पिल्लाची त्याच्या आईसोबत पुन्हा एकत्र भेट झाली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत आव्हानात्मक कारवाईत एका मादी बिबट्याला त्याच्या पिल्लासह परत मिळवून दिले आहे. ही घटना मुंबईच्या पूर्व गोरेगाव येथील फिल्मसिटीचे आहे. C३३-डेल्टा म्हणून ओळखल्या जाणार्या मादी बिबट्याला गेल्या वर्षी GPS तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सतत ट्रॅकिंग करण्यासाठी तिच्या गळ्यात ट्रॅकिंग यंत्र बसवून सोडण्यात आले होते.
१० ऑक्टोबरला वाट चुकले होते पिल्लू - खरं तर, १० ऑक्टोबरला पहाटे, सुरक्षा कर्मचार्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीपासून १००मीटर अंतरावर बिबट्याचे एक लहान पिल्लू आढळले. त्यांनी ते पिल्लू वनविभागाच्या ताब्यात दिले गेले. अधिकाऱ्यांनी त्याला एसएनजीपी पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवले. ही प्रक्रिया ११ ऑक्टोबरलाही सुरू होती. पिंजरा ठेवलेल्या जागेभोवती संपूर्ण टीम गुप्तपणे तैनात होती. आजूबाजूला कॅमेरे लावले होते. मात्र, या दिवशीही आई आपल्या मुलाकडे येऊ शकली नाही.
आईला मिठी मारली - दुसऱ्या दिवशी पहाटे ४.४५ वाजता मादी बिबट्या पिंजऱ्याजवळ आली. आई मुलाच्या जवळ येताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीने पिंजऱ्याचे दार उघडले आणि पिल्लाने धावत जाऊन आईला मिठी मारली. इतक्या दिवसांनी आईनेही आपल्या मुलाला भेटून त्याची निगा राखली, त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत ती त्याला घेऊन जंगलात गायब झाली.
आरे कॉलनीत झालेल्या हल्ल्यानंतर तिला पकडण्यात आले होते. खरे तर २०२१मध्ये आरे कॉलनीतील मानवी वस्तीत बिबट्यांचा सतत हल्ला झाल्याचे आढळून आले होते. यानंतर वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचला, त्यात मादी बिबट्या C33 डेल्टा अडकली होती. पण तीला पकडल्यानंतरही हल्ल्याचे सत्र काही थांबले नाव्हते. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने गळ्यात ट्रॅकरची कॉलर घालून तीला सोडून दिले होते.