मुंबई - राज्य विधानसभेच्या अधिवेशनात ( state Assembly session ) एकाही बंडखोर आमदाराने माझ्या डोळ्यात डोळे घालून बघायची हिम्मत केली नाही. ते सर्व आमदार नजर चुकवून दुसरीकडे पाहत होते. आज तुम्ही आमच्यापासून नजर चुकवलीत, पण उद्या आमदार म्हणून जेव्हा मतदारसंघात जाणार त्यावेळेस मतदार व शिवसैनिकांना काय सांगणार? असा हल्लाबोल आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांनी बंडखोर आमदारांवर ( Shivsena Rebel MLA ) केला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांचा कालावधी संपल्यानंतर युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ( Shiv Sena leader MLA Aditya Thackeray ) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला.
आमदारांची नैतिक चाचणी झाली पाहिजे - राज्यात शिंदे फडणवीस या नव्या सरकारच्या ( Shinde Fadnavis government ) स्थापनेनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्या निर्देशानुसार 3 आणि 4 जुलै रोजी मुंबईत विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात रविवारी बंडखोर आमदार, भाजप व महाविकास आघाडीचे आमदार उपस्थित होते. या आमदारांना कडक सुरक्षेत मुंबईत आणण्यात आले. त्यांना मीडियाशी देखील बोलू दिले नाही. हे असे किती दिवस चालणार आहे. ही लोकशाही आहे. या आमदारांच्या नैतिकतेची चाचणी झाली पाहिजे ( Aaditya Thackeray On MLAs morale Test ), असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
हॉटेलचा खर्च कोणी केला? - बंडखोर शिंदे गटाकडून आम्ही शिवसैनिक असल्याचा दावा केला जात आहे. आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, राक्षसी महत्वाकांक्षा असणारे स्वतःला शिवसेना म्हणत आहेत. परंतु इथे तुम्हाला माझ्यासोबत दिसत आहेत हीच शिवसेना असून आम्ही शिवसेना म्हणून काम करत राहू. बंडखोरांच्या चार्टर्ड प्लेन, हॉटेल यांचा खर्च कसा केला? असा प्रश्न त्यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
नैतिकतेच्या लढाईत हरले - मतदान झाल्यानंतर उपाध्यक्षांजवळ आम्ही आमचा व्हीप दिला आणि तो उपाध्यक्षांनी मान्य केला आहे. अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले असले तरी भाजप आणि बंडखोर आमदार नैतिकतेच्या चाचणीत हरले आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. तसेच आता ते अजून किती जणांना पेढे भरवणार आहेत, हे पाहणे महत्वाचे असल्याचे ठाकरे म्हणाले.
हेही वाचा - Ajit Pawar To CM Eknath Shinde: सांगितले असते तर आधीच मुख्यमंत्री केले असते - अजित पवार