ETV Bharat / city

Rana Couple Bailed : राणा दाम्पत्याला जामीन.. मात्र, कधी होणार सुटका? 'अशी' आहे सर्व प्रक्रिया - आमदार रवी राणा

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण प्रकरणी खासदार नवनीत ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांना काल जामीन मिळाला ( Rana Couple Bailed ) आहे. आज त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. ही सुटका कधी होणार? आणि कशी आहे सुटकेची प्रक्रिया, जाणून ( Accused Release Procedure After Bail ) घेऊयात..

navneet rana ravi rana
नवनीत राणा रवी राणा
author img

By

Published : May 5, 2022, 11:16 AM IST

मुंबई- खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांना मुंबई सत्र न्यायालयाने ( Mumbai Session Court ) बुधवारी जामीन मंजूर केला ( Rana Couple Bailed ) असून, दोघेही जामीनावर बाहेर येणार होते. मात्र कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ शकल्या नसल्यामुळे दोघांना जामीन मिळाल्यानंतर देखील बुधवारची रात्र तुरुंगातच काढावी लागली आहे. नवनीत राणा यांची तब्येत खराब असल्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे नवनीत राणा यांची रात्र जेजे रुग्णालयातच गेली. दुसरीकडे रवी राणा यांना तळोजा जेलमध्ये त्यांची रात्र काढावी लागली आहे. यापूर्वी देखील शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ( Aryan Khan Case ) याला मुंबई उच्च न्यायालयाकडून ( Bombay High Court ) जामीन मिळाल्यानंतरही देखील एक रात्र जेलमध्ये काढावी लागली होती.( Accused Release Procedure After Bail )

त्यानंतरच होणार सुटका : मुंबई सत्र न्यायालयातून जामीन मिळाला असला तरी जामीनाची प्रक्रिया बोरीवली कोर्टातून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नसल्यामुळे बुधवारची रात्र नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांना तुरुंगातच राहावा लागले. राणा दाम्पत्यांच्या विरोधात खार पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. खार पोलीस स्टेशन बोरिवली कोर्टाचा अधिकारक्षेत्रात येते. मुंबई सत्र न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केल्यानंतर राणा दाम्पत्यांची आदेशाची प्रत घेऊन बोरवली कोर्टात जावं लागणार आहे. त्याठिकाणी सत्र न्यायालयात दिलेला जामीनदार कोर्टासमोर उभा करून बोरवली कोर्टाकडून आरोपी राणा दाम्पत्यांची बोरवली कोर्टातून आदेश प्रत (ऑर्डर) घेऊन ती जेल प्रशासनाच्या गेटवरील बॉक्समध्ये टाकणे बंधनकारक असते. त्यानंतर जेल प्रशासनाचे अधिकारी हे सर्व आरोपींचे जामीन ऑर्डर तपासणी केल्यानंतर त्यांना जेलमधून सोडण्यात येते असते.

काय आहे प्रक्रिया : नवनीत राणा या खासदार तर रवी राणा या आमदार आहेत. मुंबई सत्र न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केल्यानंतर विशेष कोर्टाकडून जामीन देण्याची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. जेणेकरून राणा दाम्पत्याचे वकील जामिनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑर्डरची प्रत घेऊन बोरिवली कोर्टात पोहोचले होते. मात्र अटी आणि शर्ती प्रमाणे दोघांना 50000 रकमेचा जामीन आणि तेवढ्याच किमतीचा एक सेव्हरिटी जामीनदार जामिनासाठी त्यांना द्यायचा होता. त्याचबरोबर आवश्यक फार्म भरणे, त्यामध्ये कागदपत्र लावणे, पुरावे देणे ही सर्व प्रक्रिया होती. ही प्रक्रिया पूर्ण करण्यात बुधवारी वेळ झाल्याने ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. खार पोलीस ठाणे बोरीवली कोर्टाचा हद्दीत येते. राणा दाम्पत्यांची रिमांड झाली त्या दिवशी रविवार होता. म्हणून त्या दोघांना मांजरा सुट्टीच्या कोर्टासमोर हजर करण्यात आले होता. त्यानंतर आवश्यक कागदपत्र बांद्रा कोर्टातून बोरिवली कोर्टाकडे सुपूर्द करण्यात आले होते. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेला जामिनावर बोरिवली कोर्टातून राणा दाम्पत्याच्या सुटकेचा आदेश देण्यात येतील. रिलीज ऑर्डर जेव्हा ह्या दोन्ही कारागृहाच्या बॉक्समध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत तर सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत जमा करावा लागतो. त्यानंतर कैदेत असलेल्या आरोपीची सुटका होते. मात्र आज नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांचा रिलीज ऑर्डर किंवा सुटकेचा आदेश पत्र बोरीवली कोर्टातून मिळाले नाही. त्यामुळे पुढील प्रक्रिया होऊ शकली नाही. आज ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

आर्यन खान बाबतीतही हेच घडलं : सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. आर्यन खान देखील मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर एक रात्र आर्थर रोड जेलमध्येच काढावी लागली होती. अभिनेत्री जुही चावलाने आर्यन खानचा जामीन घेतला होता. त्यावेळी काही कागदांची पूर्तता वेळेवर मुंबई सत्र न्यायालयात होऊ शकली नसल्यामुळे आर्यन खानची एक रात्र तुरुंगात वाढली होती. त्यामुळे आर्यन खानच्या वतीने जेल प्रशासनाच्या जामीन बॉक्समध्ये सकाळी अर्ज टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता आर्यन खार आर्थर रोड जेलमधून सोडण्यात आले होते.

हेही वाचा : Rana Couple Bail : जामीन मिळाल्यानंतरही राणा दाम्पत्याची आजची रात्र तुरुंगात, 'हे' आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.