मुंबई: पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना ईडी कडून तीन वेळा समनबजावण्यात आले होते त्यापैकी एक वेळा संजय राऊत यांनी कार्यालयात जाऊन चौकशीला समोर गेले होते त्यानंतर त्यांना पुन्हा समन्स आल्याने ते चौकशीला जाऊ शकले नव्हते. संजय राऊत यांनी ईडीला आठ ऑगस्टपर्यंत वेळ मागितली होती मात्र डीडीने वेळ न देता 31 जुलै च्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास राऊत यांच्या घरी छापेमारी साठी दाखल झाले होते
पत्राचाळ प्रकरणी कारवाई राऊत यांच्या विरोधात पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे ईडीने आतापर्यंत अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केले आहे. ही कारवाई काही दिवसांआधी करण्यात आली होती एकूण 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रुपयांची स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केलेली आहे राऊत यांचे अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई झाली आहे मात्र जप्तीबद्दल कोणतीही नेमकी ठोस माहिती पुढे आली नाही
भाऊ प्रविण राऊत यांनाही अटक मुंबईतील 1 हजार 39 कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे
वर्षा राऊत स्वप्ना पाटकर यांची एकत्रित मालकी ईडीने यापूर्वी 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये अटॅच केली असून मनी लॉण्ड्रींग कायदा 2022 अंतर्गत गोरेगावमधील पत्रावाला चाळ पुर्निविकास प्रकल्पामध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आलीय ही संपत्ती मे गुरू आशीष कन्स्ट्रक्शन्सचे माजी निर्देशक प्रवीण राऊत यांच्या मालकीची पालघर सफाळे पडघा येथील जमीनींबरोबरच दादरमधील वर्षा राऊत यांचा फ्लॅट आणि अलिबाग मधील किहिम समुद्रकिनाऱ्यावरील वर्षा राऊत तसेच स्वप्ना पाटकर ज्या सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत या दोघींची एकत्रित मालकी असणाऱ्या जमीनीचा समावेश आहे
काय आहे पत्राचाळ घोटाळा पत्रा चाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे गुरू आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला याअंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या बांधकामामध्ये विकासक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता मात्र म्हाडा अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी कमी केल्यामुळे विकासकाला 414 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आक्षेप निवासी लेखापरीक्षण विभागाने घेतला
म्हाडावर जोरदार ताशेरे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी म्हाडावर जोरदार ताशेरे ओढले त्यानंतर त्यास जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले एका महिन्याच्या नोटिशीची मुदत संपल्यावर विकासकाची उचलबांगडी करण्यात आली मात्र विकासकाला पुनर्वसनातील सदनिका बांधण्याआधीच विक्रीची परवानगी देणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यावर काहीही कारवाई केली नाही मात्र त्याचा फटका सामान्य रहिवाशांना बसला आहे गेली पाच वर्षे भाडे नाही आणि हक्काचे घरही गमावावे लागले आहे
आक्षेप असणारा जमीन व्यवहार काय पत्रा चाळ परिसराचे मूळ क्षेत्रफळ 193599 चौरस मीटर विकास करारनाम्यात 165805 चौरस मीटर म्हणजे 27794 चौरस मीटर कमी दाखविण्यात आले म्हाडाच्या वाटय़ाला येणाऱ्या 50 टक्के म्हणजे 13 897 चौरस मीटर जागेचा विकासकाला फायदा करून दिल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता एस डी महाजन निलंबित झालेले आहेत मे गुरू आशीष कन्स्ट्रक्शनने युनियन बँक ऑफ इंडिया कडून कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने विकासकाविरुद्ध लवादाकडे दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्याबाबत अर्ज केला त्यानुसार राष्ट्रीय कंपनी विधी लवादाने विकासकाला म्हणजेच या कंपनीला दिवाळखोर घोषित केले
एफसआय विकत कमवले 901 कोटी मे गुरू आशीष कन्स्ट्रक्शन्स'च्या नावाखाली हा सर्व घोटाळा झाला तेव्हा राजेश कुमार वाधवान सारंग वाधवा आणि प्रवीण राऊत हे या कंपनीचे निर्देश होते ही कंपनी आणि म्हाडादरम्यान झालेल्या करारामनुसार येथील 672 कुटुंबांना पुन:विकसित केलेले प्लॅट्स म्हाडाच्या माध्यमातून बांधून देणे अपेक्षित होते त्यानंतर उर्वरित जमीन ही विकासांना विकली जाणार होती मे गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स च्या निर्देशकांनी म्हाडाची फसवणूक केली त्यांनी या जागेचा एफएसआय 9 विकासकांना विकला यामधून त्यांनी अंदाज 901 कोटी 79 लाखांचा निधी मिळवला मात्र त्यांनी म्हाडासाठी 672 घरांचा बांधकाम केलं नाही
अन्य एका प्रकल्पाच्या नावे 138 कोटी तसेच मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स या कंपनीने मेडोज नावाने एका प्रकल्पाची घोषणा करुन फ्लॅट घेणाऱ्यांकडून 138 कोटींची रक्कम जमा केली या बेकायदेशीर माध्यमातून मे गुरू आशीष कन्स्ट्रक्शन्सच्या निर्देशकांनी जमा केलेली एकूण रक्कम ही एक हजार 39 कोटी 79 लाख इतकी आहे यापैकी काही संपत्ती ही जवळच्या व्यक्तींच्या नावे वळवण्यात आली असं ईडीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय
पत्नीच्या खात्यावर वळवले 55 लाख या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून 100 कोटी वळवण्यात आले. त्यानंतर प्रवीण यांनी ही रक्कम जवळच्या व्यक्तींच्या नावे फिरवली यामध्ये कंपन्या नातेवाईकांचा समावेश होता 2010 मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील 55 लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. वर्षा यांनी ही रक्कम दादरमधील फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केला
पीएमसी बँक घोटाळ्याशी संबंध 2 जानेवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना मनी लॉण्ड्रींग प्रकरणामध्ये अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधातील खटला सुरु आहे यापूर्वी 31 डिसेंबर 2020 रोजी प्रवीण राऊत यांची 72 कोटी 65 लाखांची स्थावर मालमत्ता पीएमसी बॅक घोटाळाप्रकरणी ईडीने जप्त केलेली आहे चौकशीअंती घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या विकासकाकडून राज्य सरकारने प्रकल्प काढून घेतला आणि तो म्हाडाकडे सोपवला रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी सरकारने सेवानिवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. समितीच्या अहवालानुसार जूनमध्ये पत्राचाळ पुनर्विकासाला राज्य मंत्रिमंडळाकडून परवानगी देण्यात आली
किती काम पूर्ण झाले 25 ऑगस्ट 2021 च्या आकडेवारीच्या आधारे प्राथमिक माहितीनुसार पुनर्वसन इमारतींचे आतापर्यंत केवळ 40 टक्के काम पूर्ण झाले आहे उर्वरित 60 टक्के काम पूर्ण करून घरांचा ताबा देण्यासाठी किमान तीन वर्षे लागतील असे म्हसे यांनी स्पष्ट केले या प्रकल्पात म्हाडाचाही हिस्सा असून म्हाडाला विक्रीसाठी 2700 घरे मिळणार आहेत या घरांच्या कामालाही सुरुवात करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 2700 मधील 356 घरांसाठी मंडळाने 2016 मध्ये सोडत काढली असून आज पाच वर्षे झाली या घराचे विजेते ताबा कधी मिळेल या प्रतीक्षेत आहेत म्हाडाच्या विक्रीयोग्य घरांच्या इमारतीच्या कामाला सुरुवात झाल्यास या विजेत्यांनाही दिलासा मिळणार आहे
घरात सापडले रोख 11 लाख संजय राऊत यांच्या घरी छापेमारी करत असताना त्यांच्या घरून 11 लाख पन्नास हजार रुपयाची रोख रक्कम सापडली होती या रकमेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव होते या संदर्भात सुनील राऊत यांनी असे म्हटले होते की ही रक्कम आयोध्याला गेलेल्या कार्यक्रमाच्या खर्चासाठी जमा केलेली होती आणि ही रक्कम पार्टीची असल्याचे देखील म्हटले होते मात्र एकनाथ शिंदे यांनी अशी कुठलीही रक्कम राऊत यांना दिली नव्हती असे म्हटले होते
सध्या मुक्काम आर्थर रोड मधे संजय राऊत सध्या आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत राऊत यांना वेगळ्या सेपरेट बॅरेक मध्ये ठेवण्यात आले आहे राऊत रोज सकाळी नियमित दिनचर्या सुरू असून कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार त्यांना आरोग्याची समस्या असल्याने घरचे जेवण आणि मेडिकल मिळण्यासची परवानगी देण्यात आलेली आहे सध्या याच कारागृहामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा मुक्काम आहे मात्र राऊत हे या दोघांपासून वेगळ्या बॅरेक मध्ये असल्याची माहिती आहे
जेल प्रशासनाची मनाई संजय राऊत यांना बुधवार रोजी शिवसेना खासदार आणि काही आमदार भेटण्यासाठी कारागृहामध्ये आले असता त्यांना भेट देण्यास जेल प्रशासनाने मनाई केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार न्यायालयीन कोठडीत असलेल्या व्यक्तीला केवळ आरोपीचे रक्तातील नातेवाईकच भेटू शकतात या व्यतिरिक्त जर कोणाला भेटायचे असल्यास त्यांनी न्यायालयाची परवानगी मागणे बंधनकारक आहे याचमुळे जेल प्रशासनाने एक खासदार आणि दोन आमदारांची संजय राऊत यांच्या सोबत होणारी भेट नाकारले आहे