ETV Bharat / city

Political Analysis : दिल्लीतील वाढलेल्या राजकीय गाठीभेटींचा नेमका अर्थ काय? - संजय राऊत राहुल गाधी भेट

दिल्लीत राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्यामुळे राज्यातील राजकारणाच्या हालचालींना मोठा वेग आला आहे. गेल्या आठवडाभरापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी दिल्लीत होत आहेत.

political leaders
संग्रहित फोटो
author img

By

Published : Aug 6, 2021, 9:58 PM IST

मुंबई - राज्यात असलेल्या चार प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी दिल्लीत वाढत आहेत. या भेटींमधून महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्ष एकमेकांना संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे.

दिल्लीत राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्यामुळे राज्यातील राजकारणाच्या हालचालींना मोठा वेग आला आहे. गेल्या आठवडाभरापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी दिल्लीत होत असल्याने नेमकं राज्याच्या राजकारणात काय सुरू आहे? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट झाली. या भेटी आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दिल्लीत गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तत्काळ दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळते. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना समोर ठेवून या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा - शरद पवारांसोबत गुप्तगू सुरु असतानाच रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची घेतली भेट

  • दिल्लीत शरद पवार आणि अमित शाह यांची भेट -
    meet
    शरद पवार आणि अमित शाह यांची भेट

शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन 3 ऑगस्ट रोजी भेट घेतली होती. अमित शाह यांच्याकडे नव्याने तयार करण्यात आलेले सहकार खातं आहे. या सहकार खात्या संबंधित चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या भेटीदरम्यान इतर राजकीय चर्चाही झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत होतं. तसेच ही भेट झाल्यानंतर शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पुण्यात येण्याचे आमंत्रणही दिलं आहे. सहकार मंत्री म्हणून अमित शाह यांनी पुण्यातील शुगर इन्स्टिट्यूटला भेट द्यावी असं आमंत्रण शरद पवार यांनी अमित शाह यांना दिलं. या गाठी भेटीतून भाजप आणि शरद पवार यांच्यात असलेल्या संबंधाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. भविष्याचा विचार करून शरद पवार यांनी भाजपसोबत जवळीक कायम ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी व्यक्त केले आहे.

  • संजय राऊत आणि राहुल गांधी यांची चर्चा -

अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात विरोधक एकत्र आले. यावेळी राहुल गांधी आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये जवळपास पाऊण तास दिल्लीत चर्चा झाली. पहिल्यांदाच संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची खासगीत भेट घेतली. या भेटी दरम्यान अनेक राजकीय विषयांवर चर्चा तर झालीच. यासोबतच राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बाबतीत देखील या भेटीदरम्यान चर्चा झाल्याची माहिती समोर येत होती. यासोबतच शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा देण्यासाठी संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीतून शिवसेना काँग्रेससोबत जवळीक साधू शकते असेच संकेत दिले असल्याचे मतं राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी मांडले आहे. तसेच राज्यात सातत्याने एकला चलोची भूमिका काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून समोर आणली जाते. मात्र स्थानिक नेत्यांना न जुमानता थेट दिल्ली दरबारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली जाऊ शकते असा संदेश संजय राऊत यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशला दिला असल्याचं मतही राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे.

  • देवेंद्र फडणवीस तातडीच्या दिल्ली दौऱ्यावर -

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या भेटीदरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणूक संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. आज राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपने आपल्यासाठी प्रतिष्ठेची बनवलेली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दिल्लीला रवाना होणार आहेत. या भेटीदरम्यान ते राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत चर्चा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दिल्लीत शरद पवार यांनी घेतलेली अमित शाह यांची भेट तसेच राहुल गांधी यांची संजय राऊत यांनी घेतलेली भेट यासंदर्भात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होण्याचीही शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता, मुंबईमध्ये शिवसेनेला काँग्रेसकडून मदत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या राजकीय गाठीभेटी यांचा संदर्भ येणाऱ्या काळात मोठी राजकीय उलथापालथीचे संकेत देत आहेत.

हेही वाचा - शरद पवार-अमित शाह यांची भेट झाली तर यात चुकीचं काय : संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.