ठाणे जगातली सगळ्यात महागडी, दुर्मिळ वस्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हेल माश्याच्या Whale fish उल्टीसह दोघांना डोंबिवली कल्याण रोडला असलेल्या एका हॉटेलसमोरून सापळा लावून जेरबंद करण्यात रामनगर पोलिसांना यश Two accused are in police custody आले आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 60 हजार रूपये किंमतीची उल्टी हस्तगत करण्यात आली असून यातील अन्य एकाचा पोलिस शोध घेत आहेत. नंदू किसनदेव राय (28) अर्जुन हरिश्चंद्र निर्मल (26) अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहेत. हे दोघेही उल्हासनगरमध्ये राहणारे आहेत. तर तिसरा तस्कर smuggling मधुकर पाटील हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
अन पोलिसांच्या सापळयात अडकले..डोंबिवली खंबाळपाडा भागातील कल्याण रोडला असलेल्या बंदिश पॅलेस हॉटेलसमोर Bandish Palace Hotel बुधवारी दुपारच्या सुमारास दोघे तस्कर येणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर यांना मिळाली होती. त्यानुसार गणेश जाधव, फौजदार केशव हासगुळे त्यांच्या खास पथकाने सकाळपासून हॉटेल परिसरात जाळे पसरले होते. अखेर दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन जण तेथे पोहोचले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यातील नंदू राय याच्याकडील पिशवीत आयताकृती आकाराच्या पिवळसर तांबट रंगाच्या 3 दगड सदृश्य वस्तू आढळून आल्या. या वस्तूंचे वजन 725 ग्रॅम भरले. तपासणी केली असता या तिन्ही वस्तू व्हेल माश्याची उल्टी Whale vomit असल्याचे स्पष्ट झाले. व्हेल माश्याची ही उल्टी मध्यस्थीच्या मार्फत 1 कोटी 60 लाख रुपयांना विक्रीसाठी घेऊन आल्याची कबूली नंदू राय याने दिली.
दोन्ही तस्करांना पोलीस कोठडी.. तस्कर नंदू राय आणि अर्जुन निर्मल यांच्या जबानीतून आणखी एक नाव पुढे आले. या प्रकरणातील तिसरा आरोपी मधुकर पाटील हा दिव्यातील आगासन परिसरात राहणारा आहे. त्याचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे हे अद्याप समजू शकले नाही. पोलिस त्याचाही कसोशीने शोध घेत आहेत. या प्रकरणी सरकारतर्फे पोशि गिरीश शिर्के यांच्या जबानीवरून वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39, 48 (अ), 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हेल माश्याच्या उल्टी तस्करीमागे मोठी टोळी असण्याची शक्यता आहे. आज कल्याण कोर्टात दोन्ही तस्करांना हजर केले असता, अधिक चौकशीकरिता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वपोनि सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार केशव हासगुळे आणि त्यांचे पथक अधिक तपास करत आहे.