मुंबई - शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्क मैदानात होतो. यंदा शिवसेनेत मोठी फुट पडलेली आहे. एकनाथ शिंदे वेगळा गट तयार करून आज भाजपसोबत मुख्यमंत्री आहेत. त्या पार्श्वभूमीव यंदा दसरा मेळावा कुणाचा होणार असा मोठा विषय सध्या राज्यभरात चर्चेला आहे. यावर दसरा मेळावा शिवतीर्थावरच. मी उद्धवजीं सोबत. असे लहान मुले बोलत असल्याचे व्हिडिओ मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेअर केले आहेत. यावरून शिवसेनेकडून हा भावनिकतेचा नवा फंडा वापरला जात असल्याचे बोलले जात आहे.
-
#दसरा_मेळावा शिवतीर्थावरच....
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
मी उद्धवजीं सोबत.... pic.twitter.com/sG6BwJigT9
">#दसरा_मेळावा शिवतीर्थावरच....
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 3, 2022
मी उद्धवजीं सोबत.... pic.twitter.com/sG6BwJigT9#दसरा_मेळावा शिवतीर्थावरच....
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 3, 2022
मी उद्धवजीं सोबत.... pic.twitter.com/sG6BwJigT9
शिवाजी पार्कवर दसऱ्या मेळाव्यासाठी नेमकी कुणाला परवानगी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सूचक ट्वीट केले आहे. दसरा मेळावा…आतूरता असं म्हणत त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचा पाठमोरा फोटो ट्वीट केला आहे. तर फोटोच्या वर तर दसरा मेळावा शिवतीर्थावरच, मी उद्धवजीं सोबत….असं म्हणत त्यांनी दुसरं ट्वीट केलं आहे.
दरम्यान, याच मुद्द्यावरून काल माध्यमांशी बोलताना पेडणेकर यांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा पुढे नेली. मात्र, आता त्यामध्ये खोडा घातला जात आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार. त्याला कोणीही रोखू शकत नाही. हा कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न आहे. नुसते शाब्दिक फवारे उडवून हिंदुत्व सिद्ध होत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या ५६ वर्षांच्या परंपरेला छेद देऊ नका. त्याला ब्रेक देऊ नका, असे पेडणेकर म्हणाल्या होत्या.
हेही वाचा - Mahalaxmi Puja 2022: राज्यात सर्वत्र मंगलमय वातावरणात महालक्ष्मींचे उत्साहात आगमन