ETV Bharat / city

Sanjay Raut On Investigation Institution : हे 2024 पर्यंत सहन करावे लागेल;राऊतांचा सूचक इशारा

सध्या राज्यात विरोधकांकडून जे काही सुरू आहे. ते आम्हाला 2024 पर्यंत सहन करायचे आहे. असे म्हणत स्थायी समिती अध्यक्षांच्या घरावरील आयकराच्या धाडीनंतर राऊतांनी निवडणुका तोंडावर असल्याने या गोष्टी घडत आहेत असा आरोप त्यांनी केली आहे. (Sanjay Raut On Investigation Institution ) मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav)आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर आज आयकर विभागाने छापेमारी केली.

author img

By

Published : Feb 25, 2022, 11:22 AM IST

Updated : Feb 25, 2022, 11:39 AM IST

शिवसेना नेते संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत

मुंबई - मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर आज आयकर विभागाने छापेमारी केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या छापेमारीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक इशारा दिला आहे. 2024पर्यंत आम्हाला हे सहन करावं लागेल. (Yashwant Jadhav) महाराष्ट्राला सहन करावे लागेल असही राऊत म्हणाले आहेत.

यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप

पश्चिम बंगालला सहन करावं लागेल. उत्तराखंड आणि पंजाबलाही सहन करावे लागेल, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच महापालिका निवडणुका होणार आहेत. (Income Tax Raids Yashwant Jadhav Home) त्यामुळे ही छापेमारी सुरू झाल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा दावा केला. दरम्यान, यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. (sanjay raut) तसेच ती रक्कम युएईला ठेवली असल्याची चर्चा आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनीही जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे आज त्यांच्या घरावर छापे मारण्यात आले आहेत.

(2024)पर्यंत आम्हाला हे सहन करायचे आहे

महापालिका निवडणुकीची प्रक्रिया महिनाभरात सुरू होत आहे. उद्या महापालिकेच्या शिपायांवरही रेड टाकतील. महापालिकेतील काही शिपाई धनुष्यबाण लावतात. मराठी लोक आहेत. (Sanjay Raut spoke on Central Investigation Agency) शिवसेनेवर त्यांचे प्रेम आहेत. त्यामुळे ते धनुष्यबाण लावतात. आता आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. (2024)पर्यंत आम्हाला हे सहन करायचे आहे. महाराष्ट्राला सहन करायचे आहे. पश्चिम बंगालला सहन करायचे आहे. उत्तराखंडला सहन करायचे आहे. पंजाबलाही सहन करायचे आहे, असही राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा - Establishment of a SIT : गृह मंत्रालयाकडून एसआयटीची स्थापना; लोकप्रतिनिधींच्या धमक्यांची करणार चौकशी

Last Updated : Feb 25, 2022, 11:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.