मुंबई - आम्ही श्रीरामाची तुलना राहुल गांधींशी करत नाही. हे काम फक्त भाजपचे लोक करतात. राहुल गांधी हे माणूस असून मानवतेसाठी ते देशासाठी काम करत आहेत, असे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केल आहे.
राहुल गांधींची पदयात्रा ही ऐतिहासिक पदयात्रा असणार आहे. प्रभू श्रीरामही अयोध्येहून श्रीलंकेपर्यंत पायी गेले होते. परंतु, राहुल गांधी त्यापेक्षाही जास्त पदयात्रा करणार आहेत. कन्याकुमारीहून काश्मीरपर्यंत. इतिहास आहे आजपर्यंत कोणीही गेल् नाही आणि कोणी जाणारही नाही. राहुल गांधींची ऐतिहासिक पदयात्रा देशाला बदलण्यासाठी आहे. असंही मंत्री परसादी लाल मीना म्हणाले आहेत.
परसादी लाल मीना यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींच्या पदयात्रेत लोक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. राहुल गांधींची प्रभू श्रीरामाशी तुलना करण्यात आलेली नाही. प्रभू श्रीराम आणि राहुल गांधी यांच्या नावत सुरुवातीला ‘रा’ हे अक्षर येते, हा योगायोग म्हणता येईल. मात्र आम्ही प्रभू श्रीराम आणि राहुल गांधी यांच्याशी तुलना करत नाही. राहुल गांधी हे एक माणूस आहेत. तर प्रभू राम हे देव आहेत. राहुल गांधी यांच्याकडे देश पाहात आहे. असं पटोले म्हणाले आहेत.
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या मोठ्या सभा घेण्याचे प्रदेश काँग्रेसचे नियोजन आहे. तर, भाजपाने राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेवर निशाणा साधलेला आहे. ही यात्रा महाराष्ट्रात चार जिल्ह्यातच गुंडाळली जाणार असल्याचे भाजपाने म्हटले आहे. यासंदर्भात भाजपाने ट्वीटद्वारे राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात ४ जिल्ह्यातच गुंडाळली जाणार आहे. केरळ सारख्या लहानश्या राज्यात तब्बल २० दिवस थांबून राज्यभर दौरा करणाऱ्या राहुल गांधींनी महाराष्ट्रात मात्र ‘भारत जोडो’ यात्रा फक्त ४ जिल्ह्यातून करायचे ठरवले आहे. असं म्हटलेले आहे.
तर दुसरीकडे राहुल गांधींची ही भारत जोडो यात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भाजपची विचारधारा मान्य नसणारे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, नागरी संघटना यांनी देशाची अखंडता अबाधित राहावी, यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्या नेत्यांनी केले आहे.