मुंबई - राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणीच कोणाचा कायमचा मित्र नसतो. हे वाक्य अलीकडे सातत्याने सिद्ध होऊ लागले आहे. कालपर्यंत एकत्र असलेले मित्रपक्ष म्हणून काम करणारे आज एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. तर, कालपर्यंत एकमेकाला पाण्यात पाहणारे आज एका ताटात जेवत आहेत. अशी परिस्थिती राज्यात दिसू लागली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane ) हे सातत्याने शिवसेना, ठाकरे परिवारावर टीका करताना दिसायचे.
हेही वाचा - Ajit Pawar : अधिकार सचिवांना मग मुख्यमंत्री घरी बसणार का?; अजित पवारांनी डिवचले
राणे यांची भाषा बदलली - शिंदे गट-भाजपा ( Shinde BJP group alliance ) एकत्र आल्यानंतर सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेकांची भाषा बदलली आहे. तशीच नितेश राणे यांची ही भाषा बदलली. ठाकरे कुटुंबीयांवर आरोप करू नयेत असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आता नितेश राणे यांची ही भाषा बदलली आहे. ठाकरे कुटुंबीयांबद्दल चकार शब्दन उच्चारता झालेली ही आज त्यांची पहिलीच पत्रकार परिषद असावी. बोलताना नितेश राणे म्हणाले की, आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलो आहोत. हिंदुत्व हाच आमच्यातला मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे आता फक्त हिंदुत्वावरच बोला. काँग्रेस मधून स्वाभिमान पक्ष, त्यानंतर भाजपामध्ये आलेल्या राणी कुटुंबीयांचे हिंदुत्व नेमके कोणते हा प्रश्न उपस्थितथांना पडला होता.
हिंदुत्वासाठी सारं माफ - यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की हिंदुत्वासाठी आता सारे काही माफ आहे. या त्यांच्या बोलण्याचा अर्थ हिंदुत्वासाठी यापुढे काय काय माफ केले जाणार आहे आणि आतापर्यंत हिंदुत्वाच्या नावावर पक्षात दाखल झाल्यानंतर काय काय माफ केले यावरून स्पष्ट होते.
हेही वाचा - Bhandara Rape Case : भंडारा सामूहिक अत्याचाराचा तपास फास्ट ट्रॅकवर; मुख्यमंत्र्यांचे निर्देश