मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीप्रकरणी ( Maharashtra Political Crisis ) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ( Supreme Court Hearing ) झाली. त्यावर, आम्ही आशावादी आहोत, न्यायालयाने देखील हा संपूर्ण विषय अतिशय गांभीर्याने घेतला आहे. या निकालावर पुढचं राजकारण आणि पुढची दिशा अवलंबून असणार आहे. असे मत मनीषा कायंदे यांनी मांडले आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमना, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद सुरू केला. महाराष्ट्राच्या खटल्याच्या सुनावणीसाठी पाच न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन केले जाऊ शकते. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने त्याची गरज निदर्शनास आणून दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी एक ऑगस्टला होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.
काही गोष्टी स्पष्ट झाल्या - न्यायालयातील कामकाजावर आता शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे ( Shiv Sena Legislative Council MLA Manisha Kayande ) यांनी प्रतिक्रिया दिली असून त्या म्हणाल्या की, "शिवसेना संदर्भात आज जी याचीका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला आली आमदारांच्या अपात्रतेबाबतचे त्यात न्यायालयाने सर्व परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निकालातून कुणाला दिलासा मिळालाय असे म्हणता येणार नाही. परंतू यात काही महत्त्वाच्या बाबी आहेत. ते म्हणजे पक्षप्रमुखच व्हीप ठरवतात. त्या प्रातोदाने बजावलेला पक्ष आदेश हा पक्षातील सर्व सदस्यांना बंधनकारक असतो हे समोर आलं. शिवसेनेची जी घटना बाळासाहेबांनी ( Balasaheb Thackeray ) स्वतः जातीने लक्ष घालून लिहिलेली आहे. त्यातून हेच स्पष्ट होते जो पक्ष प्रमुख असेल, तोच मुख्य निर्णयकार असेल. पक्षप्रमुखांचा निर्णय पक्षातील सर्व सदस्यांना बंधनकारक असेल."
आम्ही आशावादी - "मला वाटतं न्यायालयाने देखील हा संपूर्ण विषय अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे. कारण, या निकालावर पुढचं राजकारण आणि पुढची दिशा अवलंबून असणार आहे. तसेच भविष्यात जर अशी परिस्थिती निर्माण झाल्यास न्यायालयाच्या याच निकालाचा आधार घेतला जाईल. त्यामुळे न्यायालय देखील अतिशय संवेदनशील पणे हे संपूर्ण प्रकरण हाताळत आहे. त्यामुळे आता एक तारखेला पुन्हा काय होईल याची आम्हाला उत्सुकता आहे. न्यायालयाच्या आजच्या कामकाजामुळे आम्ही आशावादी आहोत की आम्हाला न्याय मिळेल." अशी प्रतिक्रिया आमदार मनीषा कायंदे यांनी दिली आहे.
वकिलांमध्येही जोरदार वाद - दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या चर्चेत वकिलांमध्येही जोरदार वादावादी झाली. एकीकडे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) गटाची बाजू मांडली, तर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) गटाची बाजू प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी मांडली. चर्चेला सुरुवात करताना कपिल सिब्बल यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सांगितले की, त्यावर निर्णय होण्यापूर्वी शपथविधी व्हायला नको होता. ठाकरे सरकार पाडताना संविधानाचे उल्लंघन झाले, असेच सुरू राहिले तर कोणतेही सरकार पाडले जाऊ शकते, असे ते म्हणाले.
हेही वाचा - President election results : मुर्मू, सिन्हा यांच्यातून कोण होणार राष्ट्रपती? आज आहे निकाल