मुंबई - मुंबई आणि नवी मुंबईला जलमार्गाने जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित वॉटर टॅक्सीचे ( Water Taxi In Mumbai ) सुरु होण्याचे मुहूर्त ठरला आहे. येत्या 17 फेब्रुवारीला वॉटर टॅक्सी उदघाटन होणार असल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय बंदर आणि जलवाहतूकमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते वॉटर टॅक्सीचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यानंतर, ही सेवा नागरिकांसाठी खुली केली जाणार आहे.
अखेर सुरु होणार वॉटर टॅक्सी -
मुंबईनजीकच्या शहरातून सकाळी व गर्दीच्यावेळी येताना वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रस्ते वाहतुकीवरील ही कोंडी फोडण्यासाठी आणि पर्यावरण स्नेही म्हणून जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी मुंबईच्या नजीकच्या शहरांना जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी या जलमार्ग वाहतुकीची सुरूवात करण्याची घोषणा गेल्या वर्षी सरकारने केली होती. त्यानुसार महाराष्ट्र पोर्ट ट्रस्ट आणि सागरी महामंडळ युद्धपातळीवर कामाला लागले आहे. कोरोनामुळे जेट्टी उभारण्याचा कामात अडथळा निर्माण झालेला होता. अगोदर कोरोनामुळे वॉटर टॅक्सी सुरु व्हायला उशीर झाला आहे. त्यातच आता मुंबई ते बेलापूर ( Mumbai to Belapur Route ) दरम्यान वॉटर टॅक्सीचे चालविण्यासाठी सज्ज असताना सुद्धा फक्त उदघाटनासाठी ही वॉटर टॅक्सी डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलसवर उभी होती. मात्र, आता या वॉटर टॅक्सी सुरु करण्याचे मुहूर्त ठरले असून येत्या 17 फेब्रुवारीला वॉटर टॅक्सी उदघाटन होणार असल्याची माहिती मिळत आहे.
जलवाहतूकमंत्री हस्ते होणार उदघाटन -
संक्रांतीच्या मुहूर्तावर वॉटर टॅक्सीचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र, वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे वॉटर टॅक्सी उदघाटन कार्यक्रम लांबीवर गेले आहे. त्यानंतर आता मुंबई शंभर टक्के निर्बंधमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याने उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. बहुप्रतीक्षित वॉटर टॅक्सी येत्या 17 फेब्रुवारीपासून मुंबईकर आणि नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. केंद्रीय बंदर आणि जलवाहतूकमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते वॉटर टॅक्सीचे उद्घाटन होईल.
असे असणार भाडे -
वॉटर टॅक्सी सेवा चालविण्याची जबाबदारी इन्फिनिटी हार्बर सर्विस आणि वेस्ट कोस्ट मरिन या दोन खासगी कंपनीला दिली आहे. पहिल्या टप्प्यात 32 आसनी, 40 आसनी आणि 50 आसनी अशा तीन वॉटर टॅक्सी मुंबई-नवी मुंबई- एलिफंटा या मार्गावर चालवण्यात येणार आहे. डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल ते बेलापूरमार्गे पुढे माझगाव येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल आणि एलिफंटापर्यंत जाण्यासाठी एका प्रवाशाला 290 रुपये आकारण्यात येतील, तर महिन्याच्या पासासाठी 12 हजार रुपये आकारण्यात येणार आहेत.
हेही वाचा - ShivSena : देशभरात हातपाय पसरण्यासाठी शिवसेनेला उशीर झालाय का?