ETV Bharat / city

मान्सून २०२० : दोन दिवसांत तलावातील पाणीसाठ्यात ५१ हजार ६८५ दशलक्ष लिटरची वाढ - lakes in mumbai

गेल्या दोन दिवसांत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या परिसरात चांगला पाऊस झाल्याने एकूण पाणीसाठ्यामध्ये ५१ हजार ६८५ दशलक्ष लीटर अर्थात ५ हजार १६८ कोटी लीटरची भर पडली आहे. या तलाव साठ्यातून मुंबईला दररोज सरासरी ३ हजार ८५० दशलक्ष लीटर (३८५ कोटी लीटर) एवढा पाणीपुरवठा करण्यात येतो.

water supply in mumbai
दोन दिवसांत तलावातील पाणीसाठ्यात ५१ हजार ६८५ दशलक्ष लिटरची वाढ
author img

By

Published : Jul 6, 2020, 6:56 PM IST

मुंबई - गेल्या दोन दिवसांत शहराला पाणी पुरवठा करणा-या तलावांच्या परिसरात चांगला पाऊस झाल्याने एकूण पाणीसाठ्यामध्ये ५१ हजार ६८५ दशलक्ष लीटर अर्थात ५ हजार १६८ कोटी लीटरची भर पडली आहे. या तलाव साठ्यातून मुंबईला दररोज सरासरी ३ हजार ८५० दशलक्ष लीटर (३८५ कोटी लीटर) एवढा पाणीपुरवठा करण्यात येतो.

मागील दोन दिवसांत सुमारे १३ दिवसांच्या पाणी साठ्याची भर पडल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे सात तलाव असून यापैकी ५ तलाव बृहन्मुंबई महापालिकेचे आहेत. तर २ तलाव राज्यशासनाच्या अखत्यारित येतात. या तलावांची पाणी पातळी रोज सकाळी ६ वाजता मोजली व नोंदवली जाते. यानुसार ४ जुलै रोजी ७ तलावातील एकूण पाणीसाठा १ लाख ९ हजार ७ दशलक्ष लीटर होता. तर आज ६ जुलै रोजी हा पाणीसाठा १ लाख ६० हजार ६९२ दशलक्ष लीटर झाला आहे. दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे तलावांच्या पाणीसाठ्यात ५१ हजार ६८५ दशलक्ष लीटरची वाढ झाली आहे.

यामध्ये सर्वाधिक म्हणजे ३८ हजार २०८ दशलक्ष लीटरची वाढ ही 'भातसा'मध्ये, तर या खालोखाल ३ हजार ८०७ दशलक्ष लीटरची वाढ 'विहार' तलावात झाली आहे. यानंतर तानसा तलावात २ हजार २२१ दशलक्ष लीटर, तुळशी तलावात २ हजार ३८ दशलक्ष लीटर आणि मध्य वैतरणा १ हजार ९३० दशलक्ष लीटरची वाढ झाली आहे. तर अप्पर वैतरणा तलावातील जलसाठ्यात कोणतीही वाढ नोंदवण्यात आली नाही. मुंबईमध्ये पडलेल्या पावसामुळे कालच पवई तलाव भरून वाहू लागला आहे. या तलावातून औद्योगिक वापरासाठी पाणी पुरवठा करण्यात येतो.

मागील वर्षापेक्षा पाणी कमीच

मुंबईला पाणी पुरवठा करणा-या तलावांच्या साठ्यात वाढ झाली असली, तरी मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा अद्याप कमी आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी म्हणजेच ६ जुलै २०१९ रोजी सातही तलावांचा एकूण पाणीसाठा हा २ लाख १६ हजार ५२२ दशलक्ष लीटर होता. हा साठा यंदाच्या तुलनेत ५५ हजार ८३० दशलक्ष लीटरने अधिक होता. तर त्याआधीच्या वर्षी म्हणजेच ६ जुलै २०१८ रोजी ३ लाख ५५ हजार ३६० दशलक्ष लीटर होता. जो यंदाच्या पाणीसाठ्यापेक्षा दुपटीनेही अधिक होता.

गेल्या वर्षी या दिवशी भरले तलाव

गेल्या वर्षी १२ जुलै २०१९ रोजी तुळशी तलाव हा पूर्ण भरून वाहत होता. त्यानंतर २५ जुलै २०१९ रोजी तानसा, २६ जुलै २०१९ रोजी मोडक सागर, ३१ जुलै २०१९ रोजी विहार, २५ ऑगस्ट २०१९ रोजी मध्य वैतरणा आणि ३१ ऑगस्ट २०१९ रोजी अप्पर वैतरणा तलाव पूर्ण भरल्याने वाहू लागले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.