ETV Bharat / city

Face To Face Gulabrao Patil : होय, पारंपारिक दुष्काळी क्षेत्रात यंदाही पाणीटंचाई, पण.. - मंत्री गुलाबराव पाटील - पाणी टंचाई गुलाबराव पाटील

राज्यात असलेल्या पारंपारिक दुष्काळी क्षेत्रात यंदाही पाणीटंचाई आहे, मात्र कुठेही तीव्र पाणीटंचाई ( Gulabrao Patil on Water scarcity ) नाही, असा दावा राज्याचे पाणीपुरवठा ( Gulabrao Patil news on water problem ) मंत्री गुलाबराव पाटील यांनी ईटीव्ही भारतशी विशेष मुलाखतीत केला.

Gulabrao Patil on Water scarcity
पाणी टंचाई गुलाबराव पाटील
author img

By

Published : May 28, 2022, 8:58 AM IST

मुंबई - राज्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे, असा भ्रम कोणी निर्माण करत असेल तर ते चुकीचे आहे. राज्यात असलेल्या पारंपारिक दुष्काळी क्षेत्रात यंदाही पाणीटंचाई आहे, मात्र कुठेही तीव्र पाणीटंचाई ( Gulabrao Patil on Water scarcity ) नाही, असा दावा राज्याचे पाणीपुरवठा ( Gulabrao Patil news on water problem ) मंत्री गुलाबराव पाटील यांनी ईटीव्ही भारतशी विशेष मुलाखतीत केला.

माहिती देताना मंत्री गुलाबराव पाटील

हेही वाचा - Mumbai Drug Seized : मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या कारवाईत करोडोंचे ड्रग्ज जप्त

राज्यातील 455 गावे आणि 1 हजार 81 वाड्यावस्त्यांवर सुमारे 405 टँकरद्वारे पाणीपुरवठा ( Gulabrao Patil on drought Maharashtra ) केला जात आहे. मात्र, गतवर्षीपेक्षा ही परिस्थिती फार वेगळी नाही. गेल्या वर्षीही याच काळात राज्यात याच संख्येने टँकर धावत होते, त्यामुळे फार विषन्न परिस्थिती निर्माण झाली आहे, असे दाखवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते चुकीचे आहे, असा दावा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ( Face To Face Gulabrao Patil ) यांनी केला. राज्यातील औरंगाबाद, धुळे यासारख्या शहरांमध्ये पाणीटंचाईच्या विरोधात जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, काही पारंपरिक दुष्काळी क्षेत्रात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. तशीच ती यावर्षीही झाली आहे. याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील असून संबंधितांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासंदर्भात कार्यवाही चालू आहे. तर, नगरपालिकांच्या हद्दीतील पाणी प्रश्न हा नगर विकास विभागाकडे येत असल्याने त्याबाबत आपण बोलू इच्छित नाही, असेही गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.

27 हजार गावांमध्ये जल जीवन मिशन योजना - राज्यातील 27 हजार गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. याबाबतची कामे सुरू असून, येत्या एक ते दीड वर्षांत राज्यातील गावांचा पाणी प्रश्न संपुष्टात आल्याचे आपल्याला पाहायला मिळेल, असा दावाही गुलाबराव पाटील यांनी केला. राज्यात योजनांची कामे आता द्रुतगतीने सुरू झाली आहेत. या योजना पूर्णत्वास जाऊन लवकरच ग्रामीण भागातील जनतेला हक्काचे 55 लिटर दरडोई पाणी मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

निविदेची किंमत दोनदा वाढवावी लागली - जलजीवन मिशन योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे वाढलेल्या बांधकाम साहित्याच्या किंमतीमुळे या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस राज्य सरकारला या संदर्भात दोन वेळा किंमत वाढ करावी लागली. त्यानंतर या निविदांना प्रतिसाद मिळाला असून, आता हे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

विहीर पुनर्भरणासाठी योजना राबवणार - राज्यात जलजीवन मिशन सारख्या योजना राबवता येतील. मात्र त्यासाठी पाण्याची उद्भव अधिकाधिक असणे गरजेचे आहे. पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे आणि उद्भव जतन करणे हे फार महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने जलजीवन मिशन सारखीच काही भव्य योजना यासाठी आगामी काळात करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, असे झाल्यास राज्यातील पाणीटंचाईवर मात करता येईलस, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - Navneet Rana Case : नवनीत राणा प्रकरणी मुख्य सचिव, पोलीस आयुक्तांना दिल्लीला बोलवणं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.